Wed, Nov 14, 2018 08:00



होमपेज › Marathwada › ग्रा.पं. निकाला ऐकायला जाताना अपघात; एक ठार

जीप पलटी झाल्याने एकाचा मृत्यू; सात जखमी

Published On: Dec 27 2017 11:52AM | Last Updated: Dec 27 2017 11:52AM

बुकमार्क करा





बीड : प्रतिनिधी

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी बीडला निघालेल्या उमेदवारांची जीप बीड- मांजरसुंबा रस्त्यावर उलटली. यात नेकनूरच्या विद्यमान सरपंचांचे बंधू शेख वशीद अन्वर (३४) यांचा मृत्यू झाला तर इतर सात जण जखमी आहेत. ही घटना आज (बुधवार दि.27) सकाळी पावणे दहा वाजता घडली.

बीड तालुक्यातील  नेकनूर ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी मतदान झाले होते. बीड तहसील कार्यालयात मतमोजणी होऊन त्याचे निकाल जाहीर होणार आहेत. भाजपचे विद्यमान सरपंच अर्शद अन्वर या सरपंचपदाच्या उमेदवार आहेत. बुधवारी सकाळी निकाल ऐकण्यासाठी अर्शद अन्वर त्यांचे बंधू शेख वशीद व सदस्यपदाचे काही उमेदवार जीप (क्र. एमएच ४४ जी- २१८) मधून बीडला येत होते. प्रमिलादेवी महाविद्यालयासमोर चालकाचा ताबा सुटल्याने जीप रस्त्याकडेला ६० फूट अंतरावर शेतात जाऊन उलटली. वशीद अन्वर स्वत: जीप चालवत होते. जीपखाली दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सरपंच अर्शद अन्वर, मयूर काळे, बिभीषण शिंदे, अरशमीद सय्यद, रशीद पठाण, सलमान सय्यद व गुड्डू काझी हे जखमी झाले आहेत.