होमपेज › Marathwada › तलावातील पाणीसाठा संपण्याच्या मार्गावर

तलावातील पाणीसाठा संपण्याच्या मार्गावर

Published On: Jun 04 2018 1:05AM | Last Updated: Jun 03 2018 11:22PMपाटोदा : महेश बेदरे

गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही यंदा तालुक्यातील तलावांमध्ये  10 ते 12  टक्कयांपेक्षाही  कमी पाणीसाठा आहे. आता योग्यवेळी लवकरच पाऊस न झाल्यास पाटोदा परिसरातील नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. 

ज्या गावामध्ये तलाव आहेत त्यांनी फेब्रुवारी-मार्चमध्ये मृतसाठा शिल्लक रहावा म्हणून ठराव घेणे गरजेचे असते, परंतु असे न करता बहुतांश गावांनी तलावातील पाणी संपल्या नंतर ठराव घेतल्याची माहिती आहे. 
तर काही तलावावर  मोठ्या प्रमाणात विद्युतपंप टाकून पाणी उपसण्यात आले. याकड़े प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.