Fri, Mar 22, 2019 05:33
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › जैन लेण्या मोजताहेत शेवटची घटका

जैन लेण्या मोजताहेत शेवटची घटका

Published On: Jul 27 2018 1:33AM | Last Updated: Jul 27 2018 1:33AMअंबाजोगाई : प्रतिनिधी

शहरात असलेल्या योगेश्वरी मंदिराच्या बाजूस असलेल्या ऐतिहासिक वारसा सांगणार्‍या जैन लेण्या गेली अनेक वर्षांपासून गुदमरलेल्या अवस्थेत असून त्या शेवटची घटका मोजत आहेत. या जैन लेण्यांना मोकळा श्वास देण्यासाठी भारतीय जैन संघटनेने पुढाकार घ्यावा अशी  विनंती  सुदर्शन रापतवार यांच्यासह अनेक नागरिकांनी भारतीय जैन संघटनेला केली आहे.

अंबाजोगाई शहर हे खूप प्राचीन आणि ऐतिहासिक संदर्भ लाभलेले शहर आहे. या शहरात आणि शहराबाहेरील गावकुसात फिरताना याची पदोपदी साक्ष आजही आपल्याला पहावयास मिळते. योगेश्‍वरी मंदिरापासून दीड  किमी अंतरावर जयवंती नदीच्या तीरावर दोन्ही बाजूला ठराविक अंतराव दोन हत्तीखाने कोरण्यात आली होती. यापैकी नदीच्या उजव्या बाजूला मोठा आणि डाव्या बाजूला असलेला छोटा हत्तीखाना म्हणून ओळखल्या जातो. यापैकी मोठा हत्तीखान्याला योगेश्वरी देवी आणि प्रभू वैद्यनाथाच्या लग्नाच्या संदर्भातील दंतकथेची साक्ष जोडली जाते.

हा हत्तीखाना सध्या पुरातत्व विभागाच्या देखभाल दुरुस्तीखाली असल्यामुळे सुस्थितीत आहे, मात्र जयवंती नदीच्या दुसर्‍या कडेला असलेला छोटा हत्तीखाना आणि त्यात असलेल्या जैन लेणी गेली अनेकवर्षांपासून गुदमरलेल्या  अवस्थेत उभ्या आहेत. या जैन लेण्या पूर्णपणे नामशेष होण्यापूर्वीच या जैन लेण्यांना मोकळा श्वास देण्यासाठी भारतीय जैन संघटनेने पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. नागदंपत्ती, महावीर पार्श्वनाथ, वृक्षभनाथ व त्यांच्या यक्षी, सेवक याशिवाय 24 तीर्थंकारांचा शिल्पपट साकारला आहे. या परिसरात स्व्छता राखली जात नाही. त्यामुळे लेण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जैन संघटनेचे रायचंद कुंकुलोळ, शांतीलाल मुथा आदींनी लेण्यांचे संरक्षण करण्याची मागणी आहे.