Sat, Nov 17, 2018 23:07होमपेज › Marathwada › उड्डाणपुलावर सततची वाहतूक कोंडी

उड्डाणपुलावर सततची वाहतूक कोंडी

Published On: Aug 25 2018 1:15AM | Last Updated: Aug 24 2018 11:53PMपरळी : प्रतिनिधी

डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाण पुलावर सततची वाहतूक कोंडी हा नित्याचाच बनलेला विषय आहे. शुक्रवारी पुन्हाएकदा वाहतुकीचा खोळंबा झाला होता, त्यामुळे वाहनचालक हैराण झाल्याचे दिसून आले.  उड्डाणपूल, बसस्टँड रोडवर दोन ते चार तासांपासून एस.टी.पंक्चर  झाल्यामुळे उड्डाणपूलावर ट्राफिक जाम झाली. या ट्राफिक जाममुळे शाळकरी विद्यार्थी व वाहनधारक यांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागला.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनाचे कर्मचारी वेळेत न आल्याने चालक, प्रवासी चांगलेच खोळंबलेले होते. शहरातला उड्डाण पूल वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्याने एखादे वाहन जरी बंद पडले तरी त्याचा वाहतुकीवर  परिणाम होतो हे नेहमी अनुभवाला येणारे चित्र असते.  शुक्रवारी उड्डाणपुलावर एक एसटी पंक्चर  झाल्याने तब्बल चार तास उड्डाण पुलावर वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे नागरिकांना, मुलांना रस्त्यावरुन चालणे कठीण झाले आहे. श्रावण महिना चालू असल्यामुळे वैद्यनाथ मंदिरात येणार्‍या भाविकांची गर्दी जास्त आहे. या वाहतूक कोंडीचा त्रास भाविकांना होत आहे. वाहतूक सुरळीतपणे करावी अशी मागणी नागरिकातुन होत आहे. दरम्यान शहर वाहतूक व वाढती व्याप्ती लक्षात घेऊन या उड्डाणपुलाला आणखी एक समांतर उड्डाणपुलाची मागणी ग्राह्य धरण्यात आली आहे. लवकरच असा समांतर उड्डाणपूल निर्मिती सुरू होईल, असे वाटत होते, मात्र शहरातील नागरिकांना समांतर उड्डाणपुलाची ही प्रतीक्षा कायमच आहे.