होमपेज › Marathwada › सत्ताधारी नगरसेवकास कोंडून बाजाराचा लिलाव

सत्ताधारी नगरसेवकास कोंडून बाजाराचा लिलाव

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

गंगाखेडः प्रतिनिधी

नगर परिषद सभागृहात  गैरमार्गाने होणार्‍या आठवडी व दररोज बाजाराचा लिलाव थांबविण्याची मागणी करणार्‍या सत्ताधारी नगरसेवक तथा आरोग्य सभापती शे.इस्माईल शे.हुसेन यांना नगराध्यक्षांच्या कक्षामध्ये कोंडून मुख्यधिकार्‍यांनी लिलाव प्रक्रिया पूर्ण करीत मर्जीतील व्यक्तींना सदरचा ठेका दिल्याने नगर परिषदेला मोठा आर्थिक फटका बसला आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून फेर लिलाव करण्याची मागणी नगरसेवक शे.इस्माइल यांनी केली आहे.

2018-19 या कालावधीकरिता नगर परिषदेच्या वतीने आठवडी (जनावरांचा) व दररोजच्या बाजाराची लिलाव प्रक्रिया दि.26 मार्च रोजी नगर परिषदेच्या सभागृहात ठेवण्यात आली होती. यात आठवडी बाजारासाठी 9 जणांनी रीतसर अनामत रक्कम भरली होती तर आठ जणांनी दररोजच्या बाजारची अनामत रक्कम भरलेली होती. दुपारी दोन वाजता हा लिलाव सभागृहात होणार होता. आजपर्यत झालेल्या या लिलाव प्रक्रियेत नगराध्यक्षांसह नगरसेवक सभागृहात उपस्थित असायचे पण मुख्यधिकार्‍यांनी सदरील लिलावामध्ये  मर्जीतील व्यक्तींना ठेका देण्यासाठी खेळी करण्यात आली.

लिलाव सभागृहात केवळ दोघांनाच बोलविण्यात आले. यात आठवडी बाजारातील एक व दररोज बाजारचा एकास बोलावून लिलाव पूर्ण करण्यात आला.असा आरोप नगर सेवक तथा आरोग्य सभापती  शे.इस्माइल शे.हुसेन यांनी करत त्यांनी लिलाव प्रक्रिया बंद करण्याची मागणी मुख्यधिकारी यांना केली यावरून वादविवाद वाढला अखेर नगरसेवक, आरोग्य सभापती शे.इस्माइल यांना नगराध्यक्षांच्या चेंबरमध्ये कोंडले. पोलिसांना पाचारण करून लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. लिलावात सहभागी  दोघांना सदरील ठेका देण्यात येऊन सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याने यात न.प.चे मोठे आर्थिक नुकसान झाल्यावर आरोप करीत पुन्हा प्रक्रिया घेण्याची मागणी करण्यात आली. 

Tags : Marathwada, Marathwada News, Officials,  misbehaves, ruling, corporator 


  •