Fri, Nov 16, 2018 17:07होमपेज › Marathwada › सावकारकीच्या परवान्यासाठी लाच घेताना अधिकारी अटक

सावकारकीच्या परवान्यासाठी लाच घेताना अधिकारी अटक

Published On: May 30 2018 7:33PM | Last Updated: May 30 2018 7:33PMउस्मानाबाद : प्रतिनिधी

सावकारकीच्या परवान्याची फाईल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यासाठी दीड हजारांची लाच घेताना सहायक निबंधकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. सय्यद अनिस तय्यब अली असे अटक करण्यात आलेल्‍या निबंधकाचे नाव आहे. बुधवारी दुपारी तालुका निबंधक कार्यालयात ही कारवाई केली.

पोलिसांनी सांगितले, की यातील तक्रारदाराने सावकारकीचा परवाना मिळण्यासाठी तालुका सहायक निबंधक कार्यालयाकडे अर्ज केला होता. त्यांची फाईल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यासाठी सहायक निबंधक अली याने तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यातील दीड हजार रुपयांचा पहिला हप्‍ता त्याने अगोदर मागितला. दरम्यानच्या काळात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. या विभागाच्या अधिकार्‍यांनी खातरजमा करुन बुधवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील सहायक निबंधक कार्यालयात सापळा लावला. तेथे दीड हजारांची लाच घेताना सय्यद याला अटक करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक बी. व्ही. गावडे, निरीक्षक व्ही. आर. बहिर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.