Sat, Sep 22, 2018 01:49होमपेज › Marathwada › विद्यार्थ्यांनी बनविले ‘ऑफ रोड’ वाहन

विद्यार्थ्यांनी बनविले ‘ऑफ रोड’ वाहन

Published On: May 07 2018 2:03AM | Last Updated: May 06 2018 11:10PMअंबासाखर : प्रतिनिधी

येथील महात्मा बसेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनियरींग मेकॅनिकल शाखेच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांनी खडतर रस्ते, डोंगराळ भागात चालणारे वाहन बनवले आहे. 

या महाविद्यालयातील मेकॅनिकल शाखेच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेला प्रकल्प हा एका राष्ट्रीय स्पर्धेसाठी हाती घेण्यात आला होता. तो आता पूर्ण झाला आहे. या प्रकल्पात त्यांनी हे वाहन तयार केले असून, या कामासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी यांनी अर्धा खर्च केला असून, बाकीचा खर्च अभियांत्रीकीचे शिक्षण घेणार्‍या या विद्यार्थ्यांनी मिळून केला आहे. वाहन तयार करण्यासाठी एकूण 3 लाख 94 हजार एवढा खर्च आला आहे.

विद्यार्थ्यांनी तयार केलेले वाहन अतिशय प्रगत तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आले. त्यामध्ये चालकाच्या सुरक्षेबरोबरच सर्व यंत्रणा आधुनिक बसविण्यात आल्या आहेत. या प्रकल्पात तयार करण्यात आलेल्या वाहनाचे डिझाईन यशवंत साखरे, मानसी दामोशन तर पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम मयूर काळे, सरस्वती मुंडे, सस्पेन्शन सिस्टीम सुनील घाटूळ, वाजेद शेख, स्टिअरिंग सिस्टीम आदीती मुदगलकर व नम्रता डहाळे यांनी तर ब्रेक सिस्टीम तयार करण्यासाठी सौरभ लांडे यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत. 

या कामासाठी मार्गदर्शन प्राचार्य. एन. ए. रावबावले, प्राचार्य. संदीप झिरमिरे, प्राचार्य. आर. व्ही. शिवपुजे, प्राचार्य. एस. व्ही. येरिगिरे, प्राचार्य. आर. एस. फटाले यांनी विद्यार्थ्यांना केले.