Sun, Aug 25, 2019 08:04होमपेज › Marathwada › आता सुटीच्या दिवशीही मनपाचा कर भरता येणार

आता सुटीच्या दिवशीही मनपाचा कर भरता येणार

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 10 2018 11:01PMपरभणी : प्रतिनिधी

परभणी शहर महापालिकेच्या वतीने शहरातील मालमत्ताधारक व नळपट्टीधारक यांच्यासंदर्भात महापौर मीनाताई वरपुडकर यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीत  प्रभाग समिती अ,ब,क, अंतर्गत नागरिकांच्या सोयीसाठी घरपट्टी व नळपट्टी भरण्यासाठी दुपारी 3 ते रात्री 8 पर्यंत कार्यालय उघडे राहील असा निर्णय घेत सुटीच्या दिवशीही कार्यालय उघडे ठेवेले जाणार असल्याचे ठरण्यात आले. तसेच नागरिकांनी घरपट्टी, नळपट्टी भरावी, असे आवाहन करणयात आले आहे. 

महापौर मीनाताई वरपुडकर, उपमहापौर सय्यद समी ऊर्फ माजू लाला, स्थायी समिती सभापती गणेश देशमुख, सभागृहनेते भगवान वाघमारे, विरोधी पक्षनेते विजय जामकर, गटनेते जलालोद्दीन काजी,  मंगलाताई मुदगलकर, चंद्रकांत शिंदे, कर अधीक्षक अलकेश देशमुख, बिल कलेक्टर यांची बैठकीस उपस्थिती होती. परभणी शहर महापालिकेच्या वतीने शहरातील सर्व मालमत्ताधारक व नळपट्टीधारक यांना सूचना देण्यात आल्या आहेत. शहर मनपाने मालमत्ता कर नवीन आकारणी व मालमत्ता कर व नळपट्टी थकबाकीदारांना करात सूट देण्यात आली आहे. सबब सर्व मालमत्ताधारकांनी सुटीचा फायदा घ्यावा व मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापौर  मीनाताई वरपुडकर, उपमहापौर सय्यद समी ऊर्फ माजू लाला, स्थायी समिती सभापती गणेश देशमुख, सभागृहनेते भगवान वाघमारे, विरोधी पक्षनेते विजय जामकर, गटनेते जलालोद्दीन काजी, मंगलाताई मुदगलकर, चंद्रकांत शिंदे यांनी केले आहे. 

मालमत्ताधारकांनी नवीन आकारणीच्या मागणी बिलामध्ये नमूद 2017-18 ची चालू मागणी व मार्च 2017 पर्यंतच्या थकबाकीदारांसह एकरकमी कर भरल्यास थकबाकीदारांच्या रकमेवर आकारण्यात आलेल्या शास्ती (व्याज) दि.15 एप्रिल 2018 पर्यंत 50 टक्के सूट देण्यात येईल. नळपट्टीधारकांनी मार्च 2017 पर्यंतच्या थकबाकीसह मार्च 2017-18 पर्यंतची चालू मागणी एकरकमी भरल्यास थकबाकीच्या रकमेवर आकारण्यात आलेली शास्ती (व्याज) दि. 15 एप्रिल 2018 पर्यंत 100 टक्के सूट देण्यात येईल.तसेच सन 2008 पूर्वी बांधण्यात आलेल्या सर्व बांधकामांना अनधिकृत बांधकामासाठीची शास्ती माफ करण्यात येणार आहे. सबब ज्या मालमत्ताधारकांचे आपल्या इमारतीचे किंवा इमारतीच्या काही भागाचे बांधकाम दि. 4 जानेवारी 2008 च्या पूर्वी झालेले असेल अशा मालमत्ताधारकांनी असे बांधकाम दि.4 जानेवारी 2008 च्या पूर्वी झालेले आहे असे सिद्ध होणारी कागदपत्रे व मागणी बिलाची छायांकित प्रत सोबत जोडून आपल्या प्रभाग समिती कार्यालयात दि. 30 एप्रिलपर्यंत दाखल करावेत, असे आवाहन केले आहे.

Tags : Marathwada,  municipal corporations, tax, can, paid,  holidays