Sun, Jan 20, 2019 00:03होमपेज › Marathwada › यापुढे साहित्य संमेलन अध्यक्ष निवडणूक नाही

यापुढे साहित्य संमेलन अध्यक्ष निवडणूक नाही

Published On: Jul 02 2018 1:45AM | Last Updated: Jul 02 2018 1:45AMनागपूर : प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडीसाठी यापुढे मतदान प्रक्रिया राबवली जाणार नाही, तर सर्वसहमतीने ही निवड होणार आहे. 

अध्यक्ष निवडीवरून होणारे वाद टाळण्यासाठी नागपूर येथे महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेण्याच्या निर्णयाबाबत घटनादुरुस्ती करण्यात आली आहे. सध्याच्या निवडणूक प्रक्रियेमुळे साहित्य संमेलनात अनेकदा चांगल्या साहित्यिकांना अध्यक्ष होण्यापासून वंचित रहावे लागत आहे. परिणामी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला चांगले अध्यक्ष लाभत नसल्याचे कारण देत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

आगामी 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा किंवा यवतमाळपैकी एका ठिकाणी घेण्याचा निर्णयदेखील या बैठकीत झाला.