Sat, Apr 20, 2019 18:39होमपेज › Marathwada › आ.भांबळे यांच्यासह नवदाम्पत्याचे श्रमदान

आ.भांबळे यांच्यासह नवदाम्पत्याचे श्रमदान

Published On: Apr 23 2018 1:16AM | Last Updated: Apr 22 2018 11:43PMआसेगाव : प्रतिनिधी

जिंतूर तालुक्यातील आसेगाव ग्रामपंचायतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला असून, चित्रपट अभिनेता अमिर खान यांनी स्थापन केेलेल्या पाणी फाउंडेशन मार्फत ही स्पर्धा आयोजित केली आहे. 8 एप्रिल पासून सुरू झालेली  ही स्पर्धा 22 मे पर्यंत चालणार आहे. दरम्यान 21 एप्रिल रोजी सकाळी आ. विजय भांबळे यांनी गावास भेट देऊन स्वतः श्रमदान केले. तसेच ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

यावेळी जि.प. सदस्या शालिनीताई दुधगावकर, जि.प. गटनेते अजय चौधरी, सरपंच सिमा नितीन पवार, अभिनय दुधगावकर, पांडूरंग पवार, विश्‍वंभर पवार, बंडु पवार, उद्धवराव पवार, हनुमान पवार, गजानन पवार यांची उपस्थिती होती. 1 दिवसांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या राखोंडे नवदाम्पत्यानेही श्रमदान केले. श्रमदानासाठी महिला, पुरुष, मुले, महिला यांच्यासह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.