Thu, Jul 18, 2019 16:44होमपेज › Marathwada › हिंगोलीत साकारणार नवीन बसस्थानक

हिंगोलीत साकारणार नवीन बसस्थानक

Published On: Jun 01 2018 2:07AM | Last Updated: May 31 2018 10:51PMहिंगोली : प्रतिनिधी

वर्षभरापासून हिंगोली बसस्थानकाच्या नूतन इमारतीच्या प्रस्तावाची चर्चा होती. यासाठी साडेचार कोटींचा निधीही मंजूर झाला होता. परंतु तािंत्रक अडचणींमुळे मागील वर्षभरापासून नवीन बसस्थानकाच्या कामास मुहूर्त मिळला नव्हता. यातील तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. नवीन बसस्थानक बांधकामाचा मार्ग मोकळा झाला असून, जुन्या बसस्थानक परिसरात असलेल्या हॉटेलचालकांना परिवहन विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. लवकरच नव्या बसस्थानकाची टोलेजंग इमारत साकारणार आहे. यासाठी तब्बल साडेचार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

मागील वर्षभरापूर्वी हिंगोली बसस्थानकाच्या नवीन इमारतीसाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर झाला होता, परंतु कामाला मुहूर्त मिळत नव्हता. विविध तांत्रिक अडचणी व जागेच्या प्रश्‍नामुळे इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव गुलदस्त्यात होता. विभागीय कार्यालय परभणीकडून वारंवार बसस्थानकास भेटी देण्यात आल्या होत्या. हिंगोलीचे बसस्थानक जुने असून अनेक ठिकाणी मोडकळीस आले आहे. सुविधा नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. अनेक वषार्र्ंपासून बसस्थानकाची रंगरंगोटी करण्यात आली नव्हती. परिणामी बसस्थानकाला अवकळा आल्याने अनेक प्रवाशी बसस्थानकाकडे येण्यास धजावत नव्हते. 

हिंगोली आगाराचे उत्पन्न चांगले असले तरी इमारत मात्र जीर्ण झाल्यामुळे परिवहन विभागाकडून नूतन इमातरीच्या बांधकामासाठी वर्षभरापूर्वीच साडेचार कोटींचा निधी मंजूर झाला होता. जुनी इमारत पाडून नवीन सुसज्ज इमारत बांधली जाणार आहे. यासाठी ई-निविदा व इतर तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत.