Thu, Mar 21, 2019 15:28होमपेज › Marathwada › इंधनदरवाढ, महागाईच्या निषेधार्थ ढकलगाडी पदयात्रा

इंधनदरवाढ, महागाईच्या निषेधार्थ ढकलगाडी पदयात्रा

Published On: May 27 2018 1:19AM | Last Updated: May 26 2018 10:13PMपरळी : प्रतिनिधी

देशात प्रचंड महागाई वाढली आहे. अच्छे दिनच्या नावाखाली जनतेची सातत्याने फसवणूक केली जात आहे. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकर्‍यांची फसवणूक केली. पेट्रोल व डिझेल दरवाढ होत आहे. जीवघेणी इंधनदरवाढ व महागाईच्या निषेधार्थ शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परळीत अभिनव व लक्षवेधी  आंदोलन करण्यात आले. गाड्या ढकलत ढकलगाडी पदयात्रा काढून अच्छे दिन प्रमाणपत्र देऊन सरकारविरुद्ध  निदर्शने करण्यात आली.     

इंधनदरवाढीच्या विरोधात निषेध करण्यासाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राणी लक्ष्मीबाई टॉवर येथून शिवाजी महाराज चौकापर्यंत ढकलगाडी आंदोलन आणि काल्पनिक अच्छे दिनचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. दुचाकी गाड्या राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी संपूर्ण आंदोलनाच्या मार्गावर ढकलत नेल्या. शासनाच्या वतीने नायब तहसीलदार सदानंद बरदाळे यांनी निवेदन स्वीकारले. काल्पनिक अच्छे दिन प्रमाणपत्राचे वाचन देखील करण्यात आले.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,  अय्यूब पठाण, सुर्यभान मुंडे, पिंटू मुंडे, चंदुलाल बियाणी, दीपक देशमुख, सभापती शरद मुंडे, वैजनाथ बागवाले, विजय भोयटे, संजय फड, अझिझ कच्छी, गोपाळ आंधळे, श्रीकृष्ण कराड, किशोर पारधे, जयप्रकाश लड्डा बाबासाहेब गंगाधरे,शेख शम्मो, गोविंद कुकर, अनिल आष्टेकर यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.