होमपेज › Marathwada › दोन लाख कुटुंब ठरणार आयुष्यमान

दोन लाख कुटुंब ठरणार आयुष्यमान

Published On: May 03 2018 1:30AM | Last Updated: May 02 2018 11:05PMबीड : प्रतिनिधी

गरीब कुटुंबातील नागरिकांना अनेकदा पैशांभावी शहरातील मोठ्या रुग्णालयात उपचार घेता येत नाहीत, वेळेवर औषधी, उपचार न मिळाल्याने रुग्णाची स्थिती गंभीर होते. त्यांना अत्याधुनिक सुविधा असलेल्या रुग्णालयात उपचार घेता यावेत, यासाठी विमा असावा यासाठी आयुष्यमान योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी 30 एप्रिल व एक मे रोजी बीड जिल्ह्यात ग्रामसभा घेण्यात आल्या. यातून योजनेत एक लाख कुटुंबाचा समावेश करण्यात आला आहे. तर, उर्वरित कुटुंबाचा आठवड्यात घरोघर भेट देऊन समावेश करून घेण्यात येणार आहे. 

सर्वसामान्य नागरिकांसाठी राष्ट्रीय आरोग्य विमा योजना होती. यामध्ये एक लाख रुपयांपर्यंतचा फायदा रुग्णास मिळत होता, मात्र आता औषधी, खर्च वाढल्याने ही रक्कम तोकडी पडत होती. त्यामुळे 2018-19 च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेठली यांनी गरिबांसाठी आयुष्यमान योजना घोषित केली आहे. या योजनेत देशातील 40 लोकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. 

2011 मध्ये सामाजिक व आर्थिक जात निहाय सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये विविध प्रश्‍नांवरून माहिती भरून घेण्यात आली होती. आयुष्यमान ही योजना दारिद्र्य रेषेत असलेल्या कुटुंबासाठी असणार आहेत.  शासनाच्या आदेशाने 30 एप्रिल व एक मे रोजी बीड जिल्ह्यातील सर्व एक हजार 27 ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्यात आली. 

या ग्रामसभेेमध्ये सर्व कुटुंबांचे वाचन करण्यात आली. ज्या कुटुंबातील मुलींचे लग्न झाले अशा मुलींचे नाव वगळण्यात आले वे जेथे लग्न होऊन वधू आली, तेथे ते नाव समाविष्ट करण्यात आले. यासह मृत व्यक्तींचे नाव वगळण्यात आले व जन्मलेल्या बाळांच्या नावांचा समावेश करण्यात आला. जिल्ह्यात या योजनेसाठी एक लाख 81 हजार 342 कुटुंब पात्र ठरले आहेत. यातील 30 एप्रिल रोजी 70 हजार 789 व एक मे रोजी 34 हजार 69 कुटुंबाची माहिती घेण्यात आली. उवर्र्र्रित 76 हजार 574 कुटुंबाची माहिती आठ दिवसांमध्ये आशा कार्यकर्ती घरोघर भेट देऊन जमा करण्यात येणार आहेत. ही योजनेचा लाभ याच वर्षीपासून देण्यात येणार असल्याने याचा लाभ जिल्ह्यातील जवळपास दोन लाख कुटुंबांना होणार आहे.