Sun, Jul 21, 2019 12:24होमपेज › Marathwada › नरेंद्र मोदींनी पवारांच्या घरात वाकून पाहू नये : शरद पवार

नरेंद्र मोदींनी पवारांच्या घरात वाकून पाहू नये : शरद पवार

Published On: Apr 16 2019 2:18AM | Last Updated: Apr 16 2019 2:34AM
परतूर : प्रतिनिधी

माझ्या पुतण्या अजित पवार याने माझा राजकीय वारसा माझ्याकडून हिसकावून घेतला अशी बेताल वक्तव्ये पंतप्रधान मोदी करत आहेत. माझ्या परिवाराची चिंता प्रपंच नसलेल्या मोदी यांनी करू नये, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. 

परभणी लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ सोमवारी परतूर येथील सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री फौेजिया खान, माजी मंत्री राजेश टोपे, उमेदवार राजेश विटेकर, अरविंद चव्हाण, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, कपिल अकात, सुरेश देशमुख, आ. बाबाजानी दुर्राणी, निसार देशमुख,  आ. विजय भांबळे आदींची उपस्थिती होती. 

शरद पवार यांनी मोदी सरकारवर अविश्‍वास  व्यक्त करताना म्हटले की,  केंद्रातील सरकार हे लोकशाहीला घातक आहे.  गांधीचे मारेकरी नथुराम गोडसे याचे समर्थन करणारे आहे.  यामुळे आता पुन्हा जर हे सरकार निवडून आले तर ही शेवटची निवडणूक ठरेल अशी भीती जग व्यक्त करत आहे.  राफेल करार काँग्रेसच्या काळात झाला होता. तेव्हा 350 कोटींत एक विमान खरेदी ठरलेहोते.  मात्र, यानंतर जर भाजपाची सत्ता आली व हेच एक विमान सोळाशे साठ कोटी रुपयांना खरेदी करत आहेत. यासोबतच एजंट अंबानी यांनी नियुक्त केल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केला. यांना मोदी सरकार पुन्हा सत्तेत येता कामी नये मतदारांनी यांचे वाईट मनसुबे उधळत याची जागा दाखवावी.