Mon, Sep 24, 2018 17:22होमपेज › Marathwada › पतीला कंत्राट देणार्‍या नांदुर्गाच्या सरपंच अपात्र

पतीला कंत्राट देणार्‍या नांदुर्गाच्या सरपंच अपात्र

Published On: Feb 17 2018 8:11PM | Last Updated: Feb 17 2018 8:53PMउस्मानाबाद : प्रतिनिधी

बळीराजा चेतना अभियानाच्या सर्वेक्षणाचे काम पतीमार्फत पूर्ण करुन त्यांना मोबदला मिळवून दिल्याप्रकरणी तालुक्यातील नांदुर्गा येथील सरपंचांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. अनिता युवराज पाटील असे कारवाई करण्यात आलेल्‍या सरपंचांचे नाव आहे. . 

जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीनंतर त्यांनी हा निर्णय दिला. उपसरपंच लक्ष्मीकांत खटके यांनी ही तक्रार दिली होती. बळीराजा चेतना अभियानातील लाभार्थींच्या सर्वेक्षणाचे काम सरपंच पाटील यांनी पती युवराज यांना दिले होते. तसेच मोबदल्यापोटी त्यांना आठ हजार रुपये दिले होते. या रकमेचे धनादेश व पुराव्यांसह उपसरपंच खटके यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी सुनावणी घेतली. समोर आलेले पुरावे पाहून जिल्हाधिकार्‍यांनी सरपंचांना अपात्र घोषित केले. खटके यांच्यावतीने अ‍ॅड. व्ही. डी. माने यांनी काम पाहिले.