Wed, Nov 21, 2018 03:08होमपेज › Marathwada › नांदेड जिल्ह्यात अवकाळी पाऊस 

नांदेड जिल्ह्यात अवकाळी पाऊस 

Published On: Mar 11 2018 7:53PM | Last Updated: Mar 11 2018 9:02PMनांदेड : प्रतिनिधी

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार नांदेड जिल्ह्यात सर्वदूर विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. मागच्या पंधरा दिवसांपूर्वी मराठवाड्यासह इतर भागात अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई सरकारने मागच्या आठवड्यात दिली, यातून शेतकरी सावरण्यापूर्वीच रविवारी पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. 

रविवारी सकाळी नांदेड शहरात व इतर भागात सौम्य वादळी वाऱ्यासह सरी कोसळल्या. सायंकाळी पुन्हा एकदा विजांसह जोरदार पाऊस झाला. नांदेड शहरात सायंकाळी सात वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. साधारण तासाभरापेक्षा अधिक धो-धो पाऊस झाला. यासह जिल्ह्यात नायगाव, अर्धापूर, मुदखेड, बिलोलीसह इतर तालुक्यात पाऊस झाला. नांदेड शहरात तर जोरदार पाऊस बरसला.