Mon, Apr 22, 2019 04:16होमपेज › Marathwada › नांदेड : जिल्हा क्रिडाधिकार्‍याच्या कुटुंबावर जात पंचायतीचा बहिष्कार

नांदेड : जिल्हा क्रिडाधिकार्‍याच्या कुटुंबावर जात पंचायतीचा बहिष्कार

Published On: Jan 31 2018 8:32PM | Last Updated: Jan 31 2018 8:32PMनांदेड : प्रतिनिधी

लग्‍न समारंभात सन्मानपूर्वक वागणुक न दिल्याने जात पंचायतीच्या सदस्यांनी नांदेड येथील एका जिल्हा क्रिडाधिकार्‍याच्या कुटुंबियावर बहिष्कार घातला. याप्रकरणी जात पंचायतच्या अकरा जणांविरुद्ध इतवारा पोलिस ठाण्यात आज (बुधवार ३१ जानेवारी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मोहनलाल यादव यानी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की  नांदेड जिल्हा क्रिडाधिकारी गंगालाल यादव यांचा मुलगा पारस याचा विवाह दि. १० डिसेंबर रोजी नांदेड येथे पार पडला. या वेळी जात पंचायतच्या सदस्यांना सन्मानजनक वागणुक न दिल्याने जात पंचायतने इतवारा भागातील हनुमान मंदिरावर समाजाची बैठक बोलविली. यात गंगालाल यादव व त्यांच्या कुटुंबियावर बहिष्कार घालण्याचा ठराव घेतला. त्यानुसार मागच्या महिना भरात यादव कुटुंबियांना समाजाच्या कुठल्याही सोहळयात बोलवले नाही. 

जात पंचायतीने बहिष्कार घातल्यानंतर गंगालाल यादव यांचे बंधू मोहनलाल यादव यांनी इतवारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. जात पंचायतीचे सदस्य सिताराम मंडले, तुलाराम रौत्रे, दुर्गेश कोतवाल, दशरत भगत, धर्मराज कोतलवाल, सुंदरलाल मेघाव, तुळजाराम कुटल, ईश्‍वर परीवाले, सदानंद परीवाले, पवन कुटल व बाबू भातावाले या सर्वांविरुद्ध महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून संरक्षण अधिनियम सन 2016 नुसार गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा तपास फौजदार दशरथ आडे करत आहेत.