Sat, Jan 19, 2019 07:44होमपेज › Marathwada › नांदेड जिल्हाधिकार्‍यांना तुरुंगात टाकण्याचे आदेश

नांदेड जिल्हाधिकार्‍यांना तुरुंगात टाकण्याचे आदेश

Published On: Jan 16 2018 8:42AM | Last Updated: Jan 16 2018 8:41AM

बुकमार्क करा
नांदेड : प्रतिनिधी

नांदेडचे जिल्हाधिकारी, मनपा आयुक्‍त आणि भूसंपादन अधिकार्‍यांना दिवाणी तुरुंगात टाकण्याचे आदेश दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर एन. एस. मोमीन यांनी जारी केले आहेत. या प्रकरणातील आदेश एक महिन्यासाठी असताना वादीने मात्र तीन दिवसांचे या तीन उच्चपदस्थ लोकांचे तुरुंगाचे पैसे भरले आहेत. गुरू-ता-गद्दी सोहळ्याच्या वेळी शहरात अनेक ठिकाणी भूसंपादन करून विकासाच्या योजना राबविण्यात आल्या होत्या. त्यावेळी  अनेक अधिकार्‍यांनी आपल्या मर्जीचे भूसंपादन केले. काही अधिकार्‍यांनी आपल्या नातलगांच्या संपत्तीला मुख्य रस्ता मिळावा यासाठी भूसंपादन केले, परंतु त्यांना मावेजा
मिळालाा नाही.

नांदेड येथील गुरुद्वारा गेट जवळ गुरूबचन कौर मदनसिंघ यांची संपत्ती होती. त्यांनी मावेजा वाढवून मिळावा असा अर्ज न्यायालयात केला. या प्रकरणात साक्षी पुरावे झाल्यावर न्यायालयाने जवळपास 3 लाख 10  हजार रुपये गुरूबचनकौर यांना द्यावेत असा आदेश दिला. न्यायालयाचा निर्णय झाल्यावरसुध्दा त्याकडे दुर्लक्ष झाल्याने याचिका दाखल केली होती, परंतु शासनाने पैसे न भरल्याने गुरूबचनकौर यांनी जिल्हाधिकारी नांदेड, मनपा आयुक्‍त नांदेड आणि भूसंपादन अधिकारी यांना दिवाणी तुरुंगात टाकण्याची विनंती करण्यात आली. न्यायालयाने या तिन्ही लोकांनी केलेली पैसे भरण्याची चालढकल लक्षात आली आणि न्यायालयाने एक महिन्यासाठी या तिघांना  दिवाणी तुरुंगात टाकण्याचे आदेश जारी केले.