Wed, Jun 26, 2019 18:22होमपेज › Marathwada › नामदेव महाराजांच्या पालखीचे परळीत स्वागत

नामदेव महाराजांच्या पालखीचे परळीत स्वागत

Published On: Jul 14 2018 12:55AM | Last Updated: Jul 13 2018 11:13PMपरळी ः प्रतिनिधी

नर्सी नामदेव येथून 3 जुलै रोजी पंढरपूरकडे निघालेली श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पालखी तीर्थक्षेत्र  परळीत  गुरुवारी दाखल झाली. यावेळी अ.भा.वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष   रामेश्वर महाराज कोकाटे,  जीवनअण्णा शिंदे व त्यांच्या सहकार्‍यांनी पालखीचे जोरदार स्वागत केले.

नामदेव महाराज यांची पालखी नर्सी (ता.हिंगोली)  येथून 3 जुलै रोजी पंढरपूरकडे निघाली आहे. यात मोठ्या संख्येने वारकर्‍यांचा सहभाग आहे.ही पालखी परळीतील संत जगमित्रनागा मंदिर येथे मुक्कामी होती. शुक्रवारी सकाळी  सहा वाजता  पालखी अंबाजोगाईकडे निघली. या दिंडीत 500 पुरुष व 200 महिला सहभागी आहेत.     

संत शिरोमणी नामदेव महाराज पालखीचे वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष  ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी  स्वागत केले.  पालखीचे स्वागत परळीकरांनी मोठ्या उत्साहात केले.यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंबाजोगाई  येथे योगेश्वरी कॉलेच्या प्रांगणात रिंगणाचा कार्यक्रम होणार असल्याचे बळीराम सोळंके यांनी सांगितले. दरम्यान, 22 जुलै रोजी पर्यंत ही पालखी पंढरपूर येथे दाखल होणार असल्याची माहिती उपाध्यक्ष अंबादास महाराज गाडे यांनी  व काशीनाथ महाराज पातळे यांनी दिली.