Tue, Mar 19, 2019 20:26होमपेज › Marathwada › राष्ट्रवादीने भाजप उमेदवाराचा घेतला धसका

राष्ट्रवादीने भाजप उमेदवाराचा घेतला धसका

Published On: May 15 2018 1:33AM | Last Updated: May 14 2018 10:29PMअंबाजोगाई : अ. र. पटेल

बीड जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असताना सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या शीर्ष नेतृत्वाच्या दुर्लक्षामुळे पक्ष गटा तटात विखुरला गेला. लातूर बीड उस्मानाबाद विधान परिषद निवडणुकीत धक्कयावर धक्के सोसणार्‍या राष्ट्रवादीने भाजप उमेदवाराचा धसका घेतल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे दोन्हीही उमेदवाराच्या भेटीसाठी मतदार मात्र प्रतीक्षेत आहेत.

उमेदवार ठरवण्याच्या बैठकीत मतदारसंघात राष्ट्रवादीचे मते जास्त आहेत त्यामुळे ही जागा आम्हालाच पाहिजे असा आग्रह करत जागा प्रतिष्ठेची केली. काँग्रेस पक्षाच्या वतीने राजकिशोर मोदी निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, मात्र लातूर व नांदेड अशा दुहेरी निष्ठेमुळे कोणीच नाव लावून धरले नाही, त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीकडे गेली. भाजप उमेदवार सुरेश धस यांना तोडीस तोड उमेदवार देताना भाजपतून राष्ट्रवादीत प्रवेश देऊन रमेश कराड यांना उमेदवारी देण्यात आली. कराडांच्या उमेदवारीसाठी ज्या नेत्याचा सिंहाचा वाटा होता त्यांची सुरेश कराडांनी अचानक उमेदवारी परत घेतल्याने फार मोठी अडचण झाली. रमेश कराड यांनी दिलेल्या धक्कयातून राष्ट्रवादीला सावरायला वेळ लागत आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे या सुरेश धसांच्या विजयासाठी प्रतिष्ठा पणाला लावत असल्याचे दिसत आहे. अशोक जगदाळे हे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आहेत. अंबाजोगाई व केजमध्ये सत्ता केंद्र काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहेत. आघाडीचे अधिकृत उमेदवार नसल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांना काँग्रेसला भाजपपासून वेगळे करणे वाटते तेवढे सोपे काम नाही. दुसरी महत्त्वाचे म्हणजे बीड जिल्ह्यात भाजप पेक्षा काँग्रेस, राष्ट्रवादीची मते जास्त आहेत.

एमआयएमची वीस बावीस मते आहेत तर लातूर जिल्ह्यात भाजपची मते जास्त आहेत. बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे मते कोणाला मिळतात यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सक्रिय होत बीड जिल्ह्यातील नाराज गटाची मोट बांधत काँग्रेस पक्षाची खिंड अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.येत्या काळात  जिल्ह्यात या निवडणुकीसाठी प्रचाराला वेग येणार आहे. कोणकोणते नेते कोणकोणत्या उमेदवारांसोबत असेल याचा अंदाज आता राजकीय क्षेत्रातील तज्ञ मंडळी बांधू लागली आहे.दोन्ही उमेदवाराचे कार्यकर्ते देखील आपलाच उमेदवार कसा निवडून येणार हे आकडेवारीसह सांगत आहेत.

मतदार उमेदवार भेटीच्या प्रतीक्षेत

विधान परिषदेच्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य, पं. स. सभापती, नगर पालिकांचे सदस्य मतदार आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस व पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे या दोन उमेदवारांच्या भेटीची मतदारांना प्रतिक्षा आहे.  

राजकारणात काहीही होऊ शकते  

विधान  लातूर बीड उस्मानाबाद विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपला रामराम ठोकून एमआयटी संस्थेचे सर्वेसर्वा रमेश कराड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उमेदवारी मिळाल्यानंतर अचानक उमेदवारी अर्ज परत घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना त्यांनी गोंधळात टाकले. एवढे झाल्यावर रमेश कराड यांनी आता भाजपचे उमेदवार सुरेश धस यांचा श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यामुळे भाजपवाले गोंधळून गेल्याशिवाय राहिले नसतील.