Fri, Feb 22, 2019 07:25होमपेज › Marathwada › '१७ जानेवारीपासून तुळजापुरातून ह्ल्लाबोल आंदोलन'

'१७ जानेवारीपासून तुळजापुरातून ह्ल्लाबोल आंदोलन'

Published On: Jan 04 2018 7:29PM | Last Updated: Jan 04 2018 7:29PM

बुकमार्क करा
तुळजापूर : प्रतिनिधी

राज्य सरकार प्रत्येक बाबतीत अपयशी ठरले आहे. याच्या निषेधार्थ मराठवाड्यात १७ जानेवारी पासून हल्‍लाबोल आंदोलनास सुरुवात करण्यात येणार आहे. याची सुरुवात तुळजापुरातून करणार असल्याचे राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले. तुळजापूर येथील नगरपरिषद हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

सरकारच्या फसव्या घोषणा आणि न झालेल्या विकासाबाबत जनतेस अवगत करून सनदशीर मार्गाने हे हल्लाबोल आंदोलन होणार आहे. शेतकरी अडचणीत असून बेरोजगारी वाढली आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्य सरकारचे कुठल्याच क्षेत्रामध्ये चांगले किंवा भरीव काम दिसत नाही. कर्जमाफीसह इतर अनेक घोषणा सरकारने केल्या, परंतु, त्यातून शेतकऱ्यांना कसलाही दिलासा न मिळाल्याने शेतकरी आत्महत्यांच्‍या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे समाजात या सरकारविरोधात प्रक्षोभ दिसून येत आहे. राज्यसरकारचा प्रशासनावर योग्य पध्दतीने वचक नाही. त्यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी यांची अनेक कामे मार्गी न लागता प्रलंबीत राहत आहेत, असे पाटील म्‍हणाले. 

तसेच यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने हे आंदोलन हाती घेतले आहे. हे हल्लाबोल आंदोलन येत्या दि.१७ जानेवारीपासून श्री. तुळजाभवानीचे दर्शन घेऊन तुळजापूरातून सुरुवात करणार आहे. 

तुळजापूर शहर रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे सांगत तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे वर्ग करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन यावेळी पाटील यांनी केले.