Wed, May 22, 2019 14:20होमपेज › Marathwada › इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर

Published On: May 29 2018 1:36AM | Last Updated: May 28 2018 11:06PMबीड : पुढारी वृत्तसेवा

दररोज वाढणार्‍या पेट्रोल, डिझेलच्या किमतीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. इंधनदर सर्वसामान्यांच्या आवाक्यात रहावेत यासाठी काहीही उपाययोजना होताना दिसत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज अंबाजोगाई, पाटोदा व शिरूर येथे मोर्चे काढण्यात आले. या मोर्चात कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अंबाजोगाईत सायकल मोर्चा

दररोज वाढणार्‍या इंधनाच्या किमतीमुळे त्रस्त झालेल्या जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज सोमवारी अंबाजोगाईत सायकल मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी प्रथम शिवाजी चौकास हार घालून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली.

केंद्र व राज्य शासनाने पेट्रोल व डिझेलमध्ये केलेली दरवाढ ताबडतोब कमी करावी. दैनंदिन गरजेचे असणारे पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅसचे दर  दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला अर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. वरील मागणीचा शासनाने ताबडतोब विचार करावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येणार्‍या काळात तीव्र अंदोलन करण्यात येईल असा इशारा शासनास देण्यात आला या प्रसंगी माजी आ. पृथ्वीराज साठे, दत्ता सरवदे व इतर अनेक युवा कार्यकर्त्यांनी सायकल चालवून शासनाचा निषेध केलाश. या मोर्चामध्ये अनेक युवक घोड्यावर बसून ह्या मोर्चात सहभागी झाले होते.

या मोर्चात  माजी आ. पृथ्वीराज साठे, रणजित लोमटे, दत्ता सरवदे, अनिसभाई, अशोक मोदी, हामीद चौधरी, महादेव वाघमारे, जावेद भाई, सोमनाथ धोत्रे, अंकुश रेड्डी, सुगद सरवदे, अमोल सरवदे, बाबा शेख, इरफानभाई, बुद्धकरण जोगदंड, बाबासाहेब गायकवाड, मुन्ना वेडे, शिवम ताटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

पाटोद्यात गाडी ढकलो आंदोलन

दिवसेंदिवस होत होणार्‍या  पेट्रोल आणि डीझेलची दरवाढीमुळे  सर्वसामान्यांच्या  खिशाला झळ बसत असून याचा सामान्य नागरिकाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच्या निषेधार्थ सोमवारी(दि.28) रोजी पाटोदा येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून तहसील कार्यलयावर मोर्चा काढून गाड़ी ढकलो  आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादीचे नेते महेंद्र गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेला हा मोर्चा शहरातील शिवाजी चौक येथून सुरू झाला व आंबेडकर चौका मार्गे हा मोर्चा थेट तहसील कार्यालयावर धडकला यावेळी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस गणेश सानप, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष गणेश भोसले, गुलाबराव घुमरे, अनिल नागरगोजे, बाळू बन, बाबासाहेब शिंदे, महादेव राख, अशोक गाडे, राज घुमरे, तुकाराम थोरवे, अशोक बांगर, सुभाष अडागळे, शंकर चौघुले, दीपक गर्जे, प्रवीण नागरगोजे, विशाल पवळ, अशोक मिसाळ, आदित्य काळूशे, सागर गर्जे यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चा भर दुपारी निघाला तरी सरकारविरोधातील रोष प्रगट करण्यासाठी कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.