Wed, Jul 17, 2019 10:02होमपेज › Marathwada › मिरवणूक भाजपची अन् गुलाल राष्ट्रवादीचा!

मिरवणूक भाजपची अन् गुलाल राष्ट्रवादीचा!

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 15 2018 1:05AMवडवणी (जि. बीड): अशोक निपटे

प्रेमात आणि राजकारणात सर्व काही माफ असतं अस गणित सर्वपरिचित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर पंचायतीचे गटनेतेपद सांभाळनारे शेषेराव जगताप यांनीच भाजपचे विजयी उमेदवार सुरेश धसांच्या मिरवणुकीत गुलाल उधळून फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.  या दृष्यामुळे  सर्वांना आश्चर्याचाच धक्का बसला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिचवर मागील काही वर्षे खेळ गाजवणारे सुरेश धसांनी राष्ट्रवादीच्या नसा ओळखून घाव करीत   भाजपला विजय खेचून आणला. गोपीनाथराव मुंडे यांना जिवंतपणी दिलेल्या यातना मृत्यूनंतर तरी काही प्रमाणात कमी करण्यासाठी धस विजयी झाल्यावर थेट गोपीनाथ गडावर गेले. गोपीनाथ गडाच्या पायर्‍यावर डोकं टेकवून मिरवणूक बीडच्या दिशेने निघाली असताना वडवणीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिशबाजी करून गुलाल उधळून त्यांचे वडवणीत स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत जगताप आणि त्यांचे बंधू नगरपंचायतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शेषराव जगताप यांनी आनंदोत्सव साजरा केला. हे दृष्य पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली. प्रेमात आणि राजकारणात सर्व काही माफ असते याची प्रचिती आली.