Wed, Feb 20, 2019 06:31होमपेज › Marathwada › राष्‍ट्रवादीचा तुळजापुरातून पुन्‍हा 'हल्‍लाबोल'

राष्‍ट्रवादीचा तुळजापुरातून पुन्‍हा 'हल्‍लाबोल'

Published On: Jan 16 2018 1:50PM | Last Updated: Jan 16 2018 1:37PM

बुकमार्क करा
उस्मानाबाद : पुढारी ऑनलाईन

राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन आज पुन्हा सुरू झाले. मराठवाड्यातून सुरू झालेले हे दुसर्‍या टप्‍प्यातील आंदोलन तुळजापुरात भवानी मातेचे दर्शन घेऊन झाले. यावेळी तुळजाभवानी मातेचा जागर, गोंधळ घालून सरकारविरोधी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. 

आज सकाळी तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर तहसीलदारांना निवेदन दिले. त्यानंतर उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी भव्य मोर्चा कार्यालयावर काढण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार अजित पवार, माजी खासदार पदमसिंह पाटील,  आमदार जयदत्त क्षिरसागर, दिलीप वळसे पाटील, राणाजगजितसिंह पाटील, राहुल मोटे आदी या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत.

शेतकरी, सामान्य जनतेच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करणारं हे बेफिकीर, खोटारडं सरकार उलथवून टाकण्याची शक्ती दे" असे साकडं आई भवानीला घालून गोंधळ, जागर करत हल्‍लाबोल यात्रा सुरू करण्यात आल्याचे राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्‍वीट केले आहे.