Tue, Jul 16, 2019 02:09होमपेज › Marathwada › उस्मानाबादेत NCP नगरसेविकेच्या मुलाची हत्या

उस्मानाबादेत NCP नगरसेविकेच्या मुलाची हत्या

Published On: Apr 21 2018 2:25PM | Last Updated: Apr 21 2018 2:32PMनळदुर्ग (उस्मानाबाद) : ( प्रतिनिधी) :

शेतीच्या वादातून माजी नगराध्यक्ष दत्तात्रय दासकर आणि राष्ट्रवादीच्या सध्याच्या नगरसेविका अंबुबाई दासकर यांच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. तुळजापूर तालुक्यातील येडोळा गावातील शिवारात ही हत्या करण्यात आली. आनंद उर्फ बाबा दत्तात्रय दासकर (वय ३२ रा.नळदुर्ग) असे मृत मुलाचे नाव आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येडोळ्यातील शिवारात ही घटना घडल्यानंतर आरोपी स्वत: पोलिसांच्या स्वाधीन झाले. नळदुर्ग पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.  

 

Tags : NCP, Corporator Son, Anand Dattatray Dasakar, Murdered, Crime, Solapur, Tuljapur, Yedola Village