Sun, Feb 24, 2019 00:24होमपेज › Marathwada › लातुरात मुस्‍लिमांचे जेलभरो आंदोलन 

लातुरात मुस्‍लिमांचे जेलभरो आंदोलन 

Published On: Aug 10 2018 4:11PM | Last Updated: Aug 10 2018 4:11PM लातूर : प्रतिनिधी 

मुस्लिमांच्या आरक्षण, संरक्षण व शिक्षण या मागण्यांसाठी लातूर येथील गांधी चौकात सकल मुस्लिम समाजाच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे.  नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार आहेत. बरेच आंदोलक हाती मागण्या व नेषेधाचे फलक घेऊन आंदोलनात सहभागी झाले आहेत. यावेळी सरकारचा निषेधाच्या घोषणा देत मोठ्या संख्येने समाज बांधव आंदोलनात सहभागी झाले आहेत. अनेक संघटनांनी या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आहे.  मराठा क्रांती चे समन्वयक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. लातूर शहराचे आमदार अमित देशमुख यांनी आंदोलका समवेत ठिय्या दिला आहे. जेलभरोच्या पार्श्‍वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
दरम्‍यान काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे.