Thu, Sep 20, 2018 08:00



होमपेज › Marathwada › तीन तलाकविरोधात मुस्लिम महिलांचा मोर्चा

तीन तलाकविरोधात मुस्लिम महिलांचा मोर्चा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





हिंगोली : प्रतिनिधी

केंद्र शासनाने मुस्लिम महिला संरक्षण व विवाहाच्या अधिकारासंदर्भात 2017 मध्ये लोकसभेत पारित केलेले विधेयक संविधानविरोधी असून ते तत्काळ रद्द करावे, या मागणीसाठी सोमवारी मुस्लिम समाजातील महिलांनी हजारोच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी 1 च्या सुमारास मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी झालेल्या महिलांच्या हातात विविध मागण्यांचे फलक झळकत होते.

केंद्र शासनाने लोकसभेत तीन तलाकविरोधात कायदा मंजूर केला. या कायद्याविरोधात मुस्लिम समाजातील महिलांमध्ये तीव्र संताप आहे. कायदा करताना मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंना, धर्म पंडितांना विचारात न घेता तो पारित केला. हा कायदा संविधानाच्या विरोधी तसेच मुस्लिम महिलांच्या विरोधी असल्याचा आरोप करीत सोमवारी हिंगोलीतील मुस्लिम महिलांना औंढा रस्त्यावरील इदगाह मैदानावरून मोर्चा काढला. हा मोर्चा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला. मोर्चात हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांनी मोर्चाच्या माध्यमातून शरियतविषयी आपली आत्मीयता व्यक्‍त केली. दुपारी 2 च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. या सभेची सुरुवात कुराण पठणाने करण्यात आली. यावेळी फातेमा निसा बाजी यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, मुस्लिम महिलांवर हा कायदा लादण्यात येत आहे. 






  •