Thu, Jan 17, 2019 06:00होमपेज › Marathwada › जुन्या पैशांच्या वादातून खून; तीन जण ताब्यात

जुन्या पैशांच्या वादातून खून; तीन जण ताब्यात

Published On: Apr 17 2018 1:52AM | Last Updated: Apr 16 2018 11:26PMनर्सी नामदेव : प्रतिनिधी

सहा महिन्यांपूर्वी हात उसणे घेतलेल्या पैशांच्या कारणावरून दोघांत वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन एका 26 वर्षीय व्यक्‍तीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दि.15 एप्रिल रोजी रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शिवाजी विक्रम पातळे (26) असे मृत इसमाचे नाव आहे. त्यांनी आरोपी पांडुरंग पिसाळ यांच्याकडून  सहा महिन्यांपूर्वी काही रक्‍कम हात उसणी घेतली होती. दरम्यान, देण्याघेण्याच्या व्यवहारातून दोघांमध्ये रविवारी दि.15 एप्रिल रोजी रात्री  धनगर गल्‍लीतील विष्णू ग्यानबा पातळे यांच्या दुकानासमोर वाद झाला. वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. यात गंभीर जखमी झालेल्या शिवाजीला नर्सी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात  नेण्यात आले. मात्र परिस्थिती नाजूक असल्यामुळे तत्काळ हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात हलवले असता, वैद्यकीय अधिकार्‍यांनी शिवाजीस  मृत घोषित केले. 

Tags : Hingoli,Murder, old money dispute, Three people, custody,