Sat, Jul 20, 2019 23:40होमपेज › Marathwada › देशात माजलगावची नगर परिषद 32 वी

देशात माजलगावची नगर परिषद 32 वी

Published On: Jun 24 2018 1:33AM | Last Updated: Jun 23 2018 10:05PMमाजलगाव : प्रतिनिधी

केंद्र शासनाने स्वच्छ सर्वेक्षण 2018 या राबविलेल्या अभियानात माजलगाव नगर पालिकेने देशातून 32 वा तर जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी नेहमीच अग्रेसर असलेले सहाल चाऊस यांच्या अथक प्रयत्नामुळे आज माजलगाव नगर परिषदेचे नाव देश पातळीवर झळकले असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. या यशामुळे नगराध्यक्षांसह पालिकेच्या पदाधिकार्‍यांचे सर्व सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

केंद्र शासनाने संपूर्ण देशात स्वच्छतेवर मोठ्याप्रमाणात भर देऊन स्वच्छ भारत अभियान राबविले. देशातील सर्वच पालिकेला यात सहभागी करून घेतले आहे.सर्वांना प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध बक्षीस ठेवून स्वच्छ स्वरक्षण 2018 या शीर्षकाखाली देशपातळीवर मोठे सर्वेक्षण करण्यात आले होते. देशातील दोन हजार 400 नगर पालिकेचे सर्वेक्षण करून केंद्र शासनाने नुकतीच क्रमवारी जाहीर केली आहे. या सर्वेक्षणात माजलगाव नगर पालिकेने बाजी मारली असून या अभियानात देशात 32 वा, महाराष्ट्रात 19 वा, मराठवाड्यात पाचवा तर बीड जिल्ह्यातून पहिला येण्याचा मान मिळविला आहे.

केंद्र शासनाने घेतलेल्या या अभियानात नागरिकांचे प्रबोधन, उघड्यावर स्वच्छतेस न जाने, सर्वसाधारण स्वच्छता व नागरिकांचा प्रतिसाद या चार मुद्यांवर सर्वेक्षण करून नगर पालिकेला गुण देण्यात आले आहेत. यात सर्वच बाबतीत माजलगाव नगर पालिका सरस ठरल्याने पालिकेचे नाव देशाच्या अजिंठ्यावर झळकले आहे. या अभियानात मार्गदर्शक म्हणून जिल्हा प्रशासनाचे अधिकारी सतीश शिवणे यांची भूमिका अत्यंत मोलाची ठरली आहे.

नगराध्यक्ष सहाल चाऊस यांची स्वप्नपूर्ती 

शहराच्या स्वच्छतेबाबत माजलगावचे नगराध्यक्ष सहाल चाऊस हे नेहमीच अग्रेसर राहिलेले आहेत. स्वच्छतेचा विषय हा त्यांच्या आवडीचा विषय असल्याने स्वच्छता कर्मचार्‍यावर निगराणी ठेवण्यासाठी ते पहाटेपासूनच रस्त्यावर उतरून स्वच्छता करून घेताना शहरातले नागरिक नेहमीच पाहतात. स्वच्छ सर्वेक्षणात माजलगाव नगर पालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याने स्वच्छ शहरासाठी मागील अनेक वर्षांपासून तत्पर असलेल्या नगराध्यक्ष सहाल चाऊस यांची एक प्रकारे स्वप्नपूर्तीच झाली आहे.