Tue, Apr 23, 2019 22:13होमपेज › Marathwada › जिल्ह्यात ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

जिल्ह्यात ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 16 2018 10:25PMपरभणी : प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात 16 मे रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. परभणी शहरातील खानापूर फाटा परिसरात दुपारी 2 वाजता रास्ता रोको करण्यात आला. 

परभणी
 
शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्यावी व स्वामीनाथन आयोग लागू करावा, बोंडअळीचे पैसे तत्काळ शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावेत, पीक विम्याची रक्‍कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावी व घोटाळेबाज विमा कंपनीवर कारवाई करावी, पिंप्री रोहिला येथील शिवरस्ता मंजूर करणे या मागण्या शासनाने त्वरित पूर्ण कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी नागोराव मोहिते, संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष कदम, जिल्हाध्यक्ष दिनकर गरूड, मराठा सेवासंघाचे पप्पू शिंदे, शेतकरी संघटनेचे ज्ञानेश्‍वर जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेेचे विशवनाथ रनेर,  नागनाथ देशमुख, शरद पवार हे उपस्थित होते. 

कोक
 
येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व युवक काँग्रेसतर्फे सकाळी 11 वाजता रास्ता रोको करण्यात आला. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक सरोदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे इरशाद पाशा, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नागसेन भेरजे, विश्‍नाथ अंभुरे, निवृत्ती लहाडे, जिजाजी गलांडे, दत्तराव आवचार, मा. सरपंच भगवान चोपडे, दगडूबा वंजीर, माउली देशमुख, भिवाजी मानवते, माउली कदम हे उपस्थित होते.

मानवत
 
तालुक्यातील मानवत रोड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष माधव निर्वळ यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांसाठी सेलू फाट्यावर सकाळी 10:00 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. एक तास आंदोलन करण्यात येऊन सहायक पोलिस निरीक्षक किरण पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनात सुकाणू समितीचे अध्यक्ष बालासाहेब आळणे, ज्ञानेश्‍वर निर्वळ, विक्रम निर्वळ, डी. के. भिसे, संजय देशमुख, आश्रोबा खरात, सरपंच राजेश कुकडे, ज्ञानोबा निर्वळ, कृष्णा मांडे, मगर आदी सहभागी झाले होते. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान यामुळे  वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.

गंगाखेड 

येथे बुधवारी सकाळी 11:30 वाजेच्या दरम्यान गंगाखेड-नांदेड महामार्गावरील इटारसी नदी पुलाजवळ रास्ता रोको करण्यात आला. रिलायन्स पीक विमा कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, सोयाबीन उत्पादकांना 40 हजार रुपये विमा देण्यात यावा, बोंडअळीने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकर्‍यांना 38500 रुपये मदत देण्यात यावी, गारपीट अनुदानातून वगळण्यात आलेल्या शेतकर्‍यांना भरपाई द्यावी, खरीप हंगामासाठी पीककर्ज द्यावे, रानडुक्‍करांचा बंदोबस्त करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलकांनी शासन विरोधी घोषणा देत महामार्गावरील वाहतूक बंद पडली. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठी वाहतूक कोंडी झाली. आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान शिदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रल्हादराव मुरकुटे, शेकापचे गोपीनाथराव भोसले, माउली लंगोटे, शेकापचे गोपीनाथ भोसले, वैजनाथ सोळंके, श्रीहरी लंगोटे, गजानन पारे, रामकिशन शिंदे, नागेश शिंदे, अप्पाराव कदम, विष्णू शिंदे, रमेश शिंदे, बन्सीधर शिंदे, पंढरी शिंदे, बाळासाहेब शिंदे, विनायक शिंदे, गणपत शिंदे, दासराव शिंदे, चेअरमन विठ्ठलराव शिंदे आदींसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.

पाथरी 

सोयाबीन पीकविमा प्रकरणी विमा कंपनीने शेतकर्‍यांची फसवणूक केली असल्याने त्या कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी दि. 16 मे रोजी भाकपच्या वतीने शहरातील सेलू कॉर्नर येथे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्ते निवेदन देण्यासाठी तहसीलदार यांच्याकडे गेले असता जोपर्यंत विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात येणार नाही तोपर्यंत दालनातून उठणार नसल्याचा पावित्रा घेतला. यामध्ये कॉ. राजन क्षीरसागर, कॉ.मुंजाभाऊ लिपणे, ज्ञानेश्‍वर काळे, नवनाथ कोल्हे, बाळासाहेब हारकळ, विजय कोल्हे, तुकाराम शिंदे, हनुमान कोल्हे, श्रीनिवास वाकानकर,अन्सिराम घाडगे, ज्ञानोबा कदम, तात्याराव कवडे, भारत फुके, सखाराम मगर, कालिदास कोल्हे, तुकाराम गिराम, भीमराव कोल्हे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. दुपारी बारा वाजता तहसीलदारांच्या दालनात सुरू झालेले ठिय्या आंदोलन तब्बल पाच वाजेपर्यंत सुरू होते. यावेळी उपविभागीय अधिकारी सी. ए. कोकणी, तहसीलदार वासुदेव शिंदे, पोलिस निरीक्षक श्रीमनवार, सहायक पोलिस निरीक्षक बोधगिरे हजर होते. उपविभागीय अधिकारी कोकणी आंदोलनकर्त्यांना समजून सांंगत होते.