Wed, Mar 20, 2019 23:17होमपेज › Marathwada › अंबाजोगाई जिल्हा करण्यासाठी आंदोलन 

अंबाजोगाई जिल्हा करण्यासाठी आंदोलन 

Published On: Mar 04 2018 1:41AM | Last Updated: Mar 03 2018 11:49PMकेज : प्रतिनिधी

अंबाजोगाईला जिल्ह्याचा व केज ला उपविभागाचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी केज तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले. अंबाजोगाईला जिल्ह्याचा दर्जा देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. अंबाजोगाईला जिल्ह्याचा दर्जा व केजला उपविभागीय दर्जा देण्याच्या मागणीसाठी केज तहसील कार्यालयासमोर अंबाजोगाई जिल्हा व केज उपजिल्हा कृती समितीच्या वतीने धरणेआंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात केज शहरातील नागरिकांसह सर्व पक्षांच्या नेतेमंडळीनी सहभाग नोंदवला. 

अंबाजोगाई जिल्हा व केजला उपविभागीय दर्जा देण्याच्या घोषणा आंदोलकांनी आंदोलना दरम्यान दिल्या.  या घोषणांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनात शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड, कृती समितीचे प्रा. हनुमंत भोसले,  स्व. डॉ. विमलताई मुंदडा विचार मंचाचे सुनील घोळवे, भाजपचे दत्ता धस, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे, एम. डी. घुले, व्यापारी संघाचे विकास मिरगणे, रोटरी क्लब ऑफ केजच्या सीता बनसोड, महेश जाजू,  गोपीनाथ इनकर, आण्णासाहेब ठोके, विलास गुंठाळ, अशोक रोडे, नागनाथ जावळे, योगेश गायकवाड यांच्यासह  अंबाजोगाई येथील राजाभाऊ औताडे, सौरव  संघेवार, रवी देशमुख यांच्यासह तालुक्यातील पत्रकार व शहरातील नागरिकांनी सहभाग घेतला होता.यावेळी तहसीलदार अविनाश कांबळे यांना आंदोलकांनी अंबाजोगाई ला जिल्ह्याचा तर केजला उपविभागीय दर्जा देण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.