Wed, Jul 17, 2019 18:13होमपेज › Marathwada › मोहन जगतापांना आमदारकीचे वेध

मोहन जगतापांना आमदारकीचे वेध

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 10 2018 11:21PMमाजलगाव : सुभाष नाकलगावकर 

माजलगाव मतदार संघात आगामी निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. विधानसभेच्या तयारीला उमेदवार लागले असून अशी तयारी मोहन जगताप यांनीही सुरू केली आहे. त्यांच्याकडे एकही जिल्हा परिषद सदस्य नाही वा पंचायत समिती नाही, अशा परिस्थितीत त्यांना आमदारकीचे वेेध लागल्याची चर्चा मतदारात होत आहे.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मोहन जगताप हे गेल्या अनेक वर्षांपासून माजलगाव मतदार संघाचे आमदार होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कार्यकर्त्यांची मर्यादीत संख्या असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांना फारसे यश मिळाले नाही. माजलगाव मतदार संघात एका ही जिल्हा परिषद गटामध्ये त्यांचा एक ही सदस्य निवडून आलेला नाही. तालखेड सर्कल हा मोहन जगतापांचा बालेकिल्ला मात्र येथेही भाजपची मदत घेऊनही त्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अपयश आले.  इतरत्र एक ही जि. प. सदस्य निवडून आणता आला नाही.  जिल्हा परिषद निवडणुकीनंतर माजलगाव मतदार संघातील मोहन जगतापांची ताकत क्षीण झाली. मोहन जगताप यांना कोणता पक्ष उमेदवारी देईल याची चर्चा सुरू आहे, मात्र   त्यांच्या राजकीय स्वभावामुळे पक्ष त्यांना स्वीकारतील का हाच खरा प्रश्‍न आहे.

Tags :  Marathwada, Mohan Jagtap, wants, MLA