Sun, Jul 21, 2019 07:50होमपेज › Marathwada › मोबाइल पॉवर बँकचा स्फोट, फर्निचरला आग

मोबाइल पॉवर बँकचा स्फोट, फर्निचरला आग

Published On: Jun 03 2018 1:15AM | Last Updated: Jun 02 2018 11:17PMबीड : प्रतिनिधी

घरामध्ये चार्जिंगला लावलेल्या मोबाइल पॉवर बँकचा स्फोट होऊन घरातील फर्निचरला आग लागल्याची घटना बीड शहरातील कोतवाल गल्ली येथे शुक्रवारी रात्री घडली. यावेळी नागरिकांना तत्काळ आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे मोठी दुर्घटना टळली.

कोतलवाल गल्ली येथे ब्राब्रस कुटुंब राहते. शुक्रवारी रात्री  ब्राब्रस कुटुंबीय घर बंद करून नातेवाइकांकाडे गेले होते. यावेळी घरामध्ये मोबाइल पॉवर बँक  चार्जिंगला लावले होते. रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास अचानक या मोबाइल पॉवर बँकचा स्फोट झाला.

यामुळे आग लागली. पॉवर बँक मधील अ‍ॅसिड इतरत्र पसरल्याने फर्निचरनेही पेट घेतला. ही बाब सुदैवाने शेजारच्यांच्या लक्षात आली. त्यांनी प्रयत्न करून आग विझविली. यावेळी घरात कोणी नसल्याने व शेजारच्यांनी आग विझविल्याने मोठी दुर्घटना टळली.