Wed, Sep 19, 2018 18:16होमपेज › Marathwada › अल्पवयीन मुलीवर बापाचा अत्याचार

अल्पवयीन मुलीवर बापाचा अत्याचार

Published On: May 05 2018 10:32PM | Last Updated: May 05 2018 10:32PMलातूर। प्रतिनिधी

स्वताच्या मुलीवर बलात्कार करण्याची नात्याला काळीमा फासणारी घटना जळकोट तालुक्यातील बेळसांगवी (एकुर्गा) येथे घडली. नराधम बापाला पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्या विरुध्द शनिवारी वाढवणा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी हा गेली दोन महिन्यांपासून त्याच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत होता. अत्याचाराबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी तो तिला देत होता.

या साऱ्या प्रकाराने मुलगी भेदरली होती व तिने हा प्रकार भीतीपोटी तिच्या आईलाही सांगितला नव्हता. पीडित मुलगी तिच्या आजीकडे गेली व तिने घडला प्रकार आजीला सांगितला. यानंतर आजीने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक गफार शेख यांनी बापाला ताब्यात घेतले आहे.