Mon, Sep 24, 2018 07:07होमपेज › Marathwada › हुंडा न घेता तो चढला बोहल्यावर

हुंडा न घेता तो चढला बोहल्यावर

Published On: Jul 16 2018 1:23AM | Last Updated: Jul 16 2018 12:04AMपरळी : प्रतिनिधी

राजकीय नेत्यांनी सामाजिक सुधारणासाठी केलेले आवाहन समाज मनावर चांगला परिणाम करत असल्याचा प्रत्यय नुकताच आला. राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथगड येथे भाषणातून बेटी बचाव, हुंडा बंदीचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत हुंडा न घेता बोहल्यावर चढून आदर्श निर्माण केला आहे. 

परळी तालुक्यातील मोहा येथील रवी हरिश्चंद्र चाटे असे हुंडा न घेता विवाह करणार्‍या युवकाचे नाव आहे. त्याचा विवाह टोकवाडी येथे पूजा उत्तमराव मुंडे हिच्यासोबत रविवार दि. 15 रोजी मोठ्या संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी नव वधू वरांना भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर समाजातील वंचित घटकांसाठी संघर्ष केला. त्यांच्या जाण्यानंतर पालकमंत्री पंकजा व खा.डॉ. प्रीतम मुंडे यांनी समाजसेवेचा, उपेक्षितांच्या सेवेचा वसा व्रत म्हणून स्वीकारला आहे. 

या दोन्ही भगिनी वंचितांचा आवाज बनल्या आहेत. गोपीनाथ गड येथे जयंती आणि पुण्यतिथीच्या होणार्‍या कार्यक्रमात पंकजा मुंडे ह्या उपस्थितांना चांगले विचार घेऊन जाण्याचे आवाहन करत असतात. मागील कार्यक्रमात त्यांनी मुलींना शिकवा, गर्भात त्यांची हत्या करू नका. हुंडा न घेता विवाह करा, असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत रवी चाटे हा युवक हुंडा न घेता रविवारी बोहल्यावर चढला. 

पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी स्त्रीभ्रूणहत्या, मुलींचे शिक्षण, हुंडाबंदी आदी विषयात जनजागृती करण्याचे काम सुुरुच ठेवले आहे.आपल्या विविध ठिकाणच्या भाषणांमधून त्या याचा वारंवार उल्लेख करतात. यामुळे बीड जिल्ह्यातील महिला, पुरुष व युवकांमध्ये याबाबत सजगता निर्माण होत असून याची काही उदाहरणेही अशा प्रकारे समोर येत आहेत.