Mon, Nov 19, 2018 06:52होमपेज › Marathwada › औरंगाबाद : विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी नातेवाईकांचा मृतदेहासह ठिय्या

औरंगाबाद : विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी नातेवाईकांचा मृतदेहासह ठिय्या

Published On: May 17 2018 1:51PM | Last Updated: May 17 2018 1:51PMपाटोदा : प्रतिनिधी

पाटोदा तालुक्यातील बांगरवाडी येथील वैशाली बिरुदेव काळे या २१ वर्षीय विवाहितेने मंगळवारी सायंकाळी विष प्राशन केले होते. त्यानंतर बुधवारी पहाटे या विवाहितेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यानंतर मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी या प्रकरणी सासरच्या मंडळींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बुधवारी रात्री शहरातील शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मृतदेहासह ठिय्या मांडल्याने तेथे प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

या प्रकरणी अखेर तब्बल पाच तासानंतर मध्यरात्री उशिरा या प्रकरणी महिलेचा पती बिरूदेव काळे, सासरे मधुकर काळे, सासू केशरबाई व नंदावा परमेश्वर देवकते यांच्या विरोधात तिचा छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या महिलेवर बांगरवाडी येथे पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.