Fri, Mar 22, 2019 05:32
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › जवळाबाजार :  कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

जवळाबाजार :  कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Published On: Dec 18 2017 5:58PM | Last Updated: Dec 18 2017 5:58PM

बुकमार्क करा

जवळाबाजार : प्रतिनिधी

औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथील मारोती तुकाराम राखोंडे या 55 वर्षीय शेतकर्‍याने सततच्या नापिकी व कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना सोमवारी दि.18 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

तालुक्यातील नालेगाव येथे शेतकरी मारोती राखोंडे हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. ते मागील काही दिवसांपासून सततची नापिकी व घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत होते. दरम्यान सोमवारी दि.18 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अण्णासाहेब राखोंडे यांच्या शेतातील आब्यांच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मयत मारोती राखोंडे यांची दीड एकर शेती असून, सततची नापिकी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पाच हजार रूपयांचे घेतलेले कर्ज होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे नालेगावात शोककळा पसरली आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल नाईक, पोलिस हेड कॉन्स्टेबल शेख खुदुस यांच्यासह आदींनी भेट दिली. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.