Sun, Apr 21, 2019 02:38होमपेज › Marathwada › केज येथे मराठी साहित्य संमेलन उत्साहात

केज येथे मराठी साहित्य संमेलन उत्साहात

Published On: Jan 29 2018 1:41AM | Last Updated: Jan 29 2018 12:27AMगोपीनाथ मुंडे साहित्यनागरी : केज

केज शहरात सहाव्या मराठी साहित्य संमेलना निमित्त  ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध देखाव्याने केजवासियांचे लक्ष वेधून घेतले. मराठवाडा साहित्य परिषद व जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, जीवन शिक्षण परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने  संमेलनाचे आयोजन कऱण्यात आले होते.

शनिवारी सहाव्या साहित्य संमेलनाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून ग्रंथदिंडी काढून करण्यात आली. ग्रंथदिंडी, पालखीसह शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी देखाव्याच्या सादरीकरणाने शहरवासियांचे लक्ष वेधले होते. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे होते. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहित्यनगरीतील स्व. विमलताई मुंदडा व्यासपीठावर साहित्य संमेलनाचे उद्घाटन आ. संगीता ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अंबासाखरचे चेअरमन रमेश आडसकर, जि. प. अध्यक्षा सविता  गोल्हार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, समाजकल्याण सभापती संतोष हांगे, जि. प. सदस्य विजयकांत मुंडे, डॉ. योगिनी थोरात, भाजपचे चिटणीस भगवान केदार, सपोनि माने, डॉ. वासुदेव नेहरकर, धनंजय कुलकर्णी, विजय आरकडे, सीता बनसोड, बंडू चौधरी, मुस्तफा कुरेशी, प्रा. हनुमंत भोसले, ईश्‍वर मुंडे, वसंत केदार, जी. बी. गदळे, वासुदेव खंदारे, जनार्दन सोनवणे, हनुमंत घाडगे, जनार्दन सोनवणे, दगडू   लोमटे, मेजर अजिमोद्दीन इनामदार आदींची उपस्थिती होती.

संमेलनाध्यक्ष डॉ. विवेक मिरगणे यांनी शांतीपूर्व वैचारिक क्रांती विचारातून होते असे मत व्यक्त केले. आमदार ठोंबरे यांनी केजमध्ये सांस्कृतिक सभागृह उभारण्याचे अश्‍वासन दिले. रमेश आडसकर यांनी साहित्यिकांचे कार्य भूषणावह असल्याने साहित्य समाजाचे आरोग्य निकोप ठेवण्याचे काम करते असे विचार मांडले.  यावेळी  शब्दगंध स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. साहित्य संमेलनाचे सूत्रसंचालन बाबासाहेब केदार, प्रास्तविक एम. डी. घुले यांनी केले   

नाट्यगृह उभारणीची मागणी

केज शहरात सांस्कृतिक कार्यक्रमासह सामाजिक कार्यक्रम आयोजित करताना आयोजकांसमोर जागेचा प्रश्‍न उपस्थित होतो. त्यामुळे अनेकदा जागेअभावी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन टाळले जाते. केज शहरात सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी नाट्यगृहाची उभारणी करण्यात यावी अशी मागणी  केली जात आहे.