होमपेज › Marathwada › नांदेड : मराठा आरक्षण; आंदोलकांची दगडफेक, पोलिसांचा नदीकाठावर बंदोबस्त

नांदेड : मराठा आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक

Published On: Jul 27 2018 2:12PM | Last Updated: Jul 27 2018 2:15PMनांदेड : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी सर्वत्र आंदोलन पेटले असून मागच्या चार दिवसापासून आंदोलनाची धग कायम आहे. नांदेड तालुक्यातील आमदुरा येथे गावकऱ्यांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आमदुरा येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. 

आंदोलनादरम्यान आंदोलक व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर जमवाकडून पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली. त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये अनेकजण जखमी झाले. जामावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधराचे नळकांडे फोडण्यात आले. अजुनही परिस्थिती तणावपूर्ण आहे. तसेच आंदोलकांकडून जलसमाधी आंदोलन केले जाण्याच्या शक्यतेमुळे उमरी, धर्माबाद व नायगाव या तालुक्यात ही नदी काठावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

आमदुरा येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, देगलूर उपअधीक्षक सरोदे,सहाय्यक नुरुल हसन यांच्यासह तीन पोलीस निरीक्षक,चार एपीआय व सहा फौजदार व 200 पोलीस कर्मचारी तैनात आहेत