Wed, May 22, 2019 06:57होमपेज › Marathwada › मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या!

मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या!

Published On: Jul 29 2018 7:35PM | Last Updated: Jul 29 2018 7:35PMअर्धापूर : प्रतिनिधी 

मराठा आरक्षण मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलने सुरू आहेत. तर, काही युवकानी आपला जीव देखील दिला आहे. हे सत्र काही केल्या थांबेनासे झाले आहे. आज, रविवार मराठवाडा येथील दाभड येथे एकाने गळफास घेवून आपले जीवन संपवले आहे. कचरू दिगंबर कल्याणे (वय-४२) असे या तरूणाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गावकरी  व परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने जमा झाले होते. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तालुक्यातील पिंपळगांव येथील प्रल्हाद कल्याणकर गुरुजी यांनी शुक्रवार दि २७ रोजी रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही घटना ताजी असतानाच दाभड येथील कचरू दिगंबर कल्याणे या तरूणाने गळफास घेत आपले जीवन संपवले. कल्याणे उच्चशिक्षित असून ते मजूरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या दोन दिवसापासून मराठा आरक्षणासाठी जीवाची बाजी लावू, आता 'करो या मरो' लढाई करावी लागेल, मी ही पिंपळगांव प्रमाणेच करू काय की?, अशी चर्चा कल्याणे करत होते. 

आज, रविवार घरातील सर्व जण बाहेर गेल्यानंतर खिशात चिठ्ठी लिहून 'एक मराठा- लाख मराठा' मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी चिठ्ठी लिहून त्याने छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आई बाहेरुन घरी आल्यानंतर ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली असता गावकरी  व परिसरातील मराठा बांधव घटनास्थळी मोठ्या संख्येने जमा झाले. जमावाने आणि नातेवाईकांनी पोलिसांना पंचनामा करत असताना रोखून धरले. शेवटी तहसिलदार अरविंद नरसीकर यांनी घटनास्थळी भेट देत कल्याणे कुंटुबास जास्तीत जास्त मदत देण्याचे आश्वासन दिले. तसेच सदरील प्रस्ताव तातडीने मुख्यमंत्री यांना सादर करण्याचे आश्वासन दिल्याने ही परिस्थिती निव्वळली. तर कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीष जाधव यांनी दहा हजार रूपयांची रोख मदत जाहिर केली व एका मुलीला शिक्षणासाठी व पालकत्व म्हणून दत्तक घेतले. 

समाजाचा संताप अन क्यूआरटी पथक माघारी

पंचनामा होऊ न देण्यासाठी गावकरी व मराठा समाज बांधव संतप्त झाले होते.  पोलिसांनी खबरदारी म्हणून क्यूआरटी पथकाला पाचारण केले. यामुळे जमाव अधिकच संतप्त झाला. पोलीस प्रशासनाने सहकार्य करण्याऐवजी क्यूआरटी पथक बोलावून भीती घालत असल्याचा आरोप करत समस्त नागरिक संतापले होते. यावेळी क्यूआरटी पथकाने गावातून माघार घेतली.