Mon, Nov 19, 2018 02:05होमपेज › Marathwada › मराठा आरक्षण : दुधना नदीपात्रात अर्ध जलसमाधी आंदोलन

मराठा आरक्षण : दुधना नदीपात्रात अर्ध जलसमाधी आंदोलन

Published On: Jul 26 2018 7:25PM | Last Updated: Jul 26 2018 7:25PMसेलू : प्रतिनिधी

मराठा समाजाच्यावतीने आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनाची तीव्रता वाढतच आहे. आज, गुरूवार पिंपरी (बु.) येथे मराठा समन्वय समितीच्यावतीने राज्य शासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यासाठी दुधना नदीपात्रात शेकडो सकल मराठा समाजातील युवक तसेच नागरिकांनी अर्ध जलसमाधी आंदोलन केले. 

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे राज्यभर आंदोलन सुरू आहे. दोन दिवसांपासून राज्यभर याचे पडसाद पाहयला मिळत आहेत. मराठवाड्यात देखील जोरदार निर्दशने करण्यात आली. अनेक ठिकाणी रास्ता रोको, ठिय्या आंदोलने करण्यात आली. तर, यासंबंधीत मागण्यांची निवेदने प्रशासनास देण्यात आली आहेत. मात्र अद्याप शासनस्तरावरुन याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नाही. यामुळे सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलन तीव्र करण्यात येत आहे. आज, गुरूवार (दि.२६) सकल मराठा समाजावतीने दुधना नदीपात्रात अर्ध जलसमाधी आंदोलन करण्यात आले. दुपारी 2 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरु होते. या आंदोलनात तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.