औरंगाबाद : प्रतिनिधी
शहरातील दंगली मागे झालेले गल्लीतील भांडण, हफ्तेखोरी, भाडेकरु हटवणे, नळ कनेक्शन आदी कारणे आहेत ही हिंदू मुस्लिम दंगल नाही, दंगलीचे रूप देऊन राजकीय फायदा घेण्यासाठी ही दंगल घडवली असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
याप्रकारची दंगल होईल असा अहवाल अडीच महिन्यांपूर्वी इंटेलिजन्सने दिला होता, मात्र या माहितीकडे वरिष्ट पोलीस अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. या सर्व घटनेची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.