Thu, Apr 25, 2019 05:47होमपेज › Marathwada › अंबाजोगाईत जाण्यास माजलगावकरांचा विरोध

अंबाजोगाईत जाण्यास माजलगावकरांचा विरोध

Published On: Mar 11 2018 1:19AM | Last Updated: Mar 11 2018 12:59AMमाजलगाव : प्रतिनिधी

बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा करण्याच्या शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. या जिल्ह्यात माजलगाव तालुक्याचा समावेश करण्यात येणार असल्याची चर्चा नागरिकांत होत आहे. यास माजलगाव तालुक्याचा कडाडून विरोध असून अंबाजोगाईत माजलगाव तालुक्याचा समावेश करू नका असे निवेदन तहसीलदार यांना शनिवारी सकाळी पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. हे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी सोमवारी उपोषण करण्यात येणार आहे.

माजलगाव पत्रकार संघाच्या मार्गदर्शन खाली मुख्यमंत्री यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे सविस्तर माहिती देऊन विरोध दर्शविला जाणार आहे. नगराध्यक्ष सहाल चाऊस हे नेतृत्व करणार आहेत. सोमवारी पत्रकार संघाच्या वतीने साखळी उपोषण सुरू कररून तीव्र विरोध करण्यात येणार आहे. यासाठी आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला असून या पत्रकावर संघाचे अध्यक्ष उमेश मोगरेकर, सुभाष नाकलगावकर, उमेश जेथलिया, हरिष यादव, सुहास बोराडे. यासह माजलगाव तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या स्वाक्षर्‍या आहेत. यावेळी सदरील निवेदन माजलगाव चे तहसीलदार एन. जी. झंपलवाड यांना देण्यात आले आहे.

माजलगाव ते बीड पिंपळनेर राज्यमार्ग मार्ग केवळ 40 कि. मी. आहे. तर अंबाजोगाई हे 90 की.मी.तर तालुक्यातील टाकरवणसह अन्य गावांना अंबाजोगाई हे जवळपास 120 कि.मी.अंतरावर आहे. यामुळे माजलगाव तालुका बीड जिल्ह्यातच राहावा तो कदापी अंबाजोगाई या नवनिर्मित जिल्ह्यात समावेश होऊ नये यासाठी माजलगाव तालुक्यात तीव्र आंदोलनाचा वनवा पेटणार असल्याचे पत्रकारसंघाच्यावतीने सांगण्यात आले. बाबत पत्रकार संघाच्या पुढाकारातून सर्व सामाजिक राजकीय पक्ष संघनेचा सहभाग माजलगाव तालुक्यातील लोक आंदोलनात होणार असल्याचे सांगण्यात आले.