Sat, Nov 17, 2018 08:15होमपेज › Marathwada › मका संशोधित वाण लागवडीसाठी मिळाली जमीन

मका संशोधित वाण लागवडीसाठी मिळाली जमीन

Published On: Jun 04 2018 1:05AM | Last Updated: Jun 03 2018 11:51PMपरभणी : प्रतिनिधी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकरिता मका या पिकाच्या संशोधीत वाणाच्या लागवडीसाठी व संशोधनासाठी जमिनीची कमतरता होती. यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात असलेल्या गल्ले बोरगाव येथील तालुका बिजगुणन केंद्राच्या जमिनीस राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने नुकतीच मान्यता दिली आहे. 

खुलताबाद तालुक्यात असलेल्या गल्ले बोरगाव येथील तालुका बिजगुणन केंद्रांतर्गत असलेल्या कृषी विभागाच्या जमिनीपैकी काही क्षेत्र मका या पिकाच्या संशोधित वाणाच्या लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यानंतर उर्वरित क्षेत्रावर कृषी विभागाने बीजोत्पादनाचा कार्यक्रम व इतर कार्यक्रम सुरू ठेवण्याचे आदेशही या मंजुरीत दिले आहेत. मका या पिकाच्या संशोधनाकरिता आवश्यक असलेले मनुष्यबळ, यंत्रसामग्री इत्यादी बाबी गल्ले बोरगाव येथील तालुका बिजगुणन केंद्रप्रमुख तसेच औरंगाबादचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही दिल्या आहेत. 

मका या पिकाच्या संशोधित वाणाची लागवड, संशोधन, देखभाल, काढणी इत्यादीकरिता येणारा देखभाल खर्च हा वनामकृवि यांनी स्वतः करावा. तसेच तालुका बिजगुणन प्रक्षेत्रावरील असलेले मनुष्यबळ वापरून सदरचे काम करून घ्यावयाचे असेल तर तो निधी शासकीय निकषाप्रमाणे विद्यापीठाने देणे बंधनकारक असल्याचेही यात नमूद करण्यात आलेले आहे.