होमपेज › Marathwada › वास्तूूंच्या देखभालीची जबाबदारी संस्थाकडे

वास्तूूंच्या देखभालीची जबाबदारी संस्थाकडे

Published On: Apr 18 2018 12:50AM | Last Updated: Apr 17 2018 11:05PMपरभणी : नरहरी चौधरी

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत बांधलेल्या मालमत्ता व वास्तुंची देखभाल तसेच दुरूस्ती करण्यास स्थानिक स्वराज्य संस्थांनी असमर्थता दाखवल्यास अशांची जबाबदारी आता नोंदणीकृत सामाजिक व विश्‍वस्त संस्थाकडे सोपवण्याचा निर्णय राज्याच्या नियोजन विभागाचे उपसचिव अनिल जोशी यांनी राज्यपालांच्या आदेशावरून निर्गमित केला. 

सदरील जबाबदारी सोपविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रकाशित करण्यात येणार आहे. यात संस्थांकडून प्राप्‍त झालेल्या अर्जापैकी एखाद्या संस्थेची शिफारस ते काम प्रस्तावित केलेल्या आमदारांना जिल्हाधिकार्‍यांकडे करता येणार आहे. यावरून जिल्हाधिकारी या संस्थेच्या नियुक्‍तीचे आदेश काढणार आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात परभणी, गंगाखेड, पाथरी व जिंतूर विधानसभा मतदार संघात या उपक्रमांतर्गत 2014-15 मध्ये घेण्यात आलेल्या आराखड्यानुसार 7 कोटी 29 लाख 9 हजार रुपयांची विकासकामे झाली आहेत. यात सीसी रस्ता, रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, ड्रेनेज बांधकाम, सांस्कृतिक सभागृह, संगणक व प्रिंटर खरेदी, सुशोभित कुंपण करणे, सभामंडप, पुस्तके खरेदी, स्मशानभूमी शेड,सामाजिक सभागृह, पुलांचे बांधकाम करणे यासह आदी कामांचा समावेश आहे.

पाथरी मतदारसंघातील गावे व कामे : आ.मोहन फड यांच्या स्थानिक निधीतून बाबुलतार, रामेटाकळी, सावळी, पेठबाभळगाव, ठोळा, इटाळी, टाकळी निलवर्ण, रत्नापूर, भिसेगाव, पोहंडूळ, पाळोदी, आर्वी, मरडसगाव, पिंपळा, पान्हेरा, पार्डी, गव्हा, पोरवड, उखळी, कोल्हा, किन्होळा, सोमठाणा, बुकतरवाडी, पडेगाव, शेवडी, सिंगणापूर, डोंगरगाव, लोणी (हिमायतनगर तांडा), इस्माईलपूर, गोगलगावसह राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेला निधी, हाटकरवाडी, भारस्वाडा, वडगाव, पिंपळगाव ठोंबरे येथे 1 कोटी 80 लाख 26 हजारांची कामे झाली. 

गंगाखेड मतदारसंघातील गावे व कामे : आ.डॉ.मधुसूदन केंद्रे यांच्या स्थानिक निधीतून फळा, सातेफळ, धानोरा मोत्या, एरंडेश्‍वर, सायळा, बनवस, पिंपळगाव, बाळापूर, सोनखेड पांढरी, भेंडेवाडी, रामापूर, ममदापूर, दगडवाडी, कळगाव वाडी, कात्नेश्‍वर, नरापूर, सोन्‍ना, मरडसगाव, खंडाळी, मुदखेड, माटेगाव, चाटोरी, शेखराजूर, आडगाव, रूखडीसह खडी, आनंदवाडी, रामापूर, पूर्णा प्रभाग 5 मध्ये 1 कोटी 80 लाख 99 हजारांची कामे झाली. 

परभणी मतदारसंघातील गावे व कामे : आ.डॉ.राहुल पाटील यांच्या स्थानिक निधीतून नांदगाव जवंजाळ, परभणीतील प्रभाग क्रं.30,पिंपरी देशमुख, मुरूंबा, समसापूर, उखळद, बाभळी, झरी, वांगी, करडगाव, आलापुर पांढरी, नांदापूर, पाथ्रा, जोडपरळी, परभणीतील ज्ञानसागर सा.वाचनालय, ज्ञानतुषार सा.वाचनालय, कारेगाव येथील इंदिरा सा.वाचनालय, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय येथे 1 कोटी 82 लाख 67 हजारांची कामे केली. 

जिंतूर-सेलू मतदारसंघातील गावे व कामे : आ.विजय भांबळे यांच्या स्थानिक निधीतून अंबरवाडी,डोहरा,सावळी बु.,खातगाव बाभट, बामणी, रेपा, डासाळा, देऊळगाव गात, वलंगवाडी, कवडा, चिंचोली दराडे, चिंचोली काळे, सावंगी, लिंबाळा, केमापूर,वाकी,वाघपिंपरी, देवसडी,पिंपळगाव तांडा, जांब खु., कोरवाडी,आंबेगाव दिगर, डिग्रस पौळ, करंजखेडा कँप, राजा, वाई, चारठाणा, वडधुती, कौसडी, माळेटाकळी, धमधम,पाचेगावसह नवीन याच्यात राजेगाव, ब्राह्मणगाव, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेला निधी, वाघी बो.येथील सिंधुबाई बोबडे पाटील सा.वाचनालय, हट्टा येथील राष्ट्रमाता जिजाऊ सा.वाचनालय, सायखेडा येथील छ.शिवाजी महाराज सा.वाचनालय, चांदज येथील शब्द सह्याद्री सा.वाचनालय, बोरी येथे प्रवाशी निवारा, मानकेश्‍वर, आडगाव बा., पार्डीतांडा, पोखर्णी तांडा, मोहाडी, गडदगव्हाण, सावरगाव तांडा येथे 1 कोटी 85 लाख 17 हजाराची कामे झाली. 

Tags : Maintenance of architecture Responsibility To the institution