Wed, Apr 24, 2019 00:20होमपेज › Marathwada › ‘मागेल त्याला काम’ योजना कागदावर

‘मागेल त्याला काम’ योजना कागदावर

Published On: Mar 06 2018 12:54AM | Last Updated: Mar 06 2018 12:46AMखंडाळा : प्रतिनिधी

हिंगोली तालुक्यातील खंडाळा परिसरामध्ये सध्या रब्बीचा हंगाम संपत येत आहे. त्यामुळे मजुरांच्या हाताला कामे मिळणे अवघड बनले आहे. त्यात शासनाची मागेल त्याला काम योजनाही केवळ कागदोपत्री चालप असल्याने परिसरारातील मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने या बाबींचा विचार करून रोहयोची कामे तत्काळ राबविण्याची गरज आहे.

शासनाने मोठा गाजावाजा करीत मागेल त्याला कामे ही महत्त्वाकांक्षी योजना आमलात आणली. सुरुवातीच्या काळात अनेकांना या योजनेच्या माध्यमातून रोजगार मिळाले. मात्र कालांतराने या योजनेला घरघर लागली. हिंगोली तालुक्यातील खंडाळा परिसरात शेतीतील रब्बी हंगामाचे कामे अंतिम टप्यात आली आहेत. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे अनेक मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. मजुरदारांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी शासनाने मागेल त्याला काम ही योजना राबवली. या माध्यमातून शासनाने बांध बंदिस्त, पाझर तलाव, नालाबंडिंग, शेततळे, पाणंद रस्ते, पक्के रस्ते, विहिरी आदी कामांमुळे मजुरदारांच्या हाताला कामे मिळायचे.

त्यामुळे मजुरांच्या कुटुंबातील व्यक्‍तीचा कसा बसा उदर निर्वाह चालायचा, परंतु मागील काही दिवसांपासून मजुरांच्या हाताला कामे नसल्यामुळे मजुरदारांचे लोंढे हे आता शहरात दाखल होत असल्याचे चित्र आहे. तसेच काही मजुरदार हे ऊस तोडणीसाठी परप्रांतात गेले आहेत. असाच प्रकार खंडाळा येथील एक मजुरदार कामानिमित्त ऊस तोडणीसाठी गेला असता. एका खोल खदाणीत पडून गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घडली आहे. या बाबीचा जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून तत्काळ रोहगार हमी योजनेची कामे ग्रामीण भागात सुरू करावीत. तसेच मजुरदारांचे होणारे स्थलांतर थांबवावे अशी मागणी ग्रामीण भागातील मजुरदारातून होत आहे.