Thu, May 28, 2020 10:42होमपेज › Marathwada › अंगणवाडी सेविका,मदतनीसांच्या सेवेवर गदा

अंगणवाडी सेविका,मदतनीसांच्या सेवेवर गदा

Published On: Mar 04 2018 1:41AM | Last Updated: Mar 04 2018 12:41AMहिंगोली : गजानन लोंढे

राज्यशासनाने आठ दिवसापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण अंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, मीनीसेविका यांची सेवेची वयोमर्यादा 65 वरून 60 वर करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार जिल्ह्यातील तब्बल 109 अंगणवाडी सेविका, मदतनीस 1 एप्रिल 2018 रोजी सेवामुक्त होणार आहेत. या निर्णयामुळे 5 वर्ष आगोदर सेवा मुक्त होणार्‍या अंगणवाडी सेविकामुळे जिल्हा प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली आहे. 

राज्यशासनाने आठवडा भरापूर्वी महिला व बालकल्याण विभागातंर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनीसेविका यांच्या सेवा समाप्तीचे वय 65 वरून 60 करण्याचा निर्णय जाहिर केला. 1 एप्रिल 2018 पर्यंत 60 वर्ष पूर्ण झालेल्या अंगणवाडी कर्मचार्‍यांना सेवामुक्त करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने आकडेवारी संकलीत केली आहे. जिल्ह्यात 1 हजार 89 अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यामध्ये जवळपास 2100 अंगणवाडी सेविका, मदतनीस कार्यरत आहेत. या निर्णयानुसार औंढा विभागात 9 अंगणवाडी सेविका, 4 मदतनीस अशा एकूण 13 सेविका कार्यमुक्त होणार आहेत. वसमत विभागात 6 अंगणवाडी सेविका 2 मदतनिस अशा एकूण 8 कर्मचार्‍यांची सेवा समाप्त होणार आहे. हिंगोली विभागात 10 अंगणवाडी सेविका, 8 मदतनीस अशा एकूण 18 जागा रिक्त होणार आहेत. आखाडा बाळापूर विभागात 11 अंगणवाडी सेविका, 16 मदतनीस असे एकूण 27 अंगणवाडी कर्मचारी सेवामुक्त होणार आहेत. कळमनुरी विभागात 15 अंगणवाडी सेविका, 15 मदतनीस अशा एकूण 30 कर्मचार्‍यांची सेवा समाप्ती होणार आहे. तर सेनगाव विभागातील 9 अंगणवाडी सेविका 4 मदतनीस अशा एकूण 13 कर्मचारी सेवामुक्त होणार आहेत. 60 अंगणवाडी सेविका, 49 अंगणवाडी मदतनीस असे एकूण 109 अंगणवाडी कर्मचारी 1 एप्रिल 2018 रोजी सेवामुक्त होणार असल्याने जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सबंधित अंगणवाडीची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.