Wed, Mar 20, 2019 09:03होमपेज › Marathwada › खा. प्रीतम मुंडेंनी घेतली प्रकाश जावडेकर यांची भेट

खा. प्रीतम मुंडेंनी घेतली प्रकाश जावडेकर यांची भेट

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बीड : प्रतिनिधी

जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या अनेक शाळा या मोडकळीस आल्या आहेत. या शाळा दुरुस्त करण्याचा ध्यास खा. प्रीतम मुंडे यांनी घेतला असून मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन  शाळा कायापालट कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या चांगल्या कार्यात सक्रिय सहभाग असेल आणि सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्‍वासन प्रकाश जावडेकर यांनी यावेळी दिले. त्यामुळे या कामाला चांगलीच गती प्राप्त होणार आहे.

मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांची नुकतीच राज्य सभेवर निवड झाल्याबद्दल खा. प्रीतम मुंडे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी   झालेल्या चर्चेत त्यांनी प्रकाश जावडेकर यांना बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या शाळा कायापालट कार्यक्रमाची माहिती दिली, तसेच या कार्यक्रमात सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली. जावडेकर यांनी यावेळी खा. प्रीतम मुंडे यांचे स्वागत करून या चांगल्या कार्यात माझे आणि सरकारचे पूर्ण सहकार्य असेल असे सांगत या चांगल्या कामात सोबत असल्याचे त्यांनी संगितले. शाळा कायापालट कार्यक्रम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असणार्‍या खा. प्रीतम मुंडे यांना पंकजा मुंडे यांच्या सोबत प्रकाश जावडेकर यांची साथ मिळणार असल्याने जिल्ह्यातील विद्यामंदिरे सुंदर, स्वच्छ होऊन विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यास सक्षम होण्यासाठी यामुळे भविष्यात मदत होईल.

खासदार निधी

बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शेतकरी, कष्टकरी लोकांची मुले शिक्षण घेत आहेत. या शाळांची अनेक ठिकाणी पडझड झाली असल्याचे तक्रारी खा. प्रीतम मुंडे यांच्याकडे प्राप्त झाल्याने त्यानी तत्काळ यावर पावले उचलत जिल्ह्यातील पडझड झालेल्या शाळांचा अहवाल मागविला. शाळा कायापालट समिती ?स्थापन करून या शाळा दुरुस्ती करण्यासाठी 1 कोटी 10 लाख रुपयांचा स्वतःच्या खासदार निधी दिला आहे. या कामी अजून निधी लागणार असून, शाळा दुरुस्ती झाल्याने विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.


  •