होमपेज › Marathwada › मनसे महिला जिल्हाध्यक्षांचा आत्मदहनाचा प्रयत्न!

मनसे महिला जिल्हाध्यक्षांचा आत्मदहनाचा प्रयत्न!

Published On: Apr 24 2018 8:18PM | Last Updated: Apr 24 2018 8:18PMउस्मानाबाद : प्रतिनिधी

सहकारी महिला कर्मचार्‍याशी अश्‍लिल चाळ्याप्रकरणी न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या मनसेच्या महिला आघाडी प्रमुख वैशाली गायकवाड यांनी आज अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.  सहकारी कर्मचाऱ्याला व्हॉटसअॅपवरील अश्लिल चॅटींग केल्याच्या प्रकरणाची दखल घेण्यासाठी त्यांनी हा सर्व प्रकार केला.  गुन्हा दाखल होऊनही शिक्षणाधिकारी सचिन जगताप याला अटक होत नसल्याने मनसेच्या महिला आघाडी प्रमुख वैशाली गायकवाड अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. 

यापूर्वी वैशाली गायकवाड यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांसह जिल्हा परिषदेत घुसून शिक्षणाधिकार्‍याच्या बंद दालनाला चपलांचा हार घातला होता. यावेळी त्यांनी शिक्षणाधिकारी जगताप यांना अटक न झाल्यास आत्मदहनाचा करणार असल्यायचा इशारा दिला होता. जिल्हा पोलिसांनी याबाबत जिल्हा परिषदेलाही कळविले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेचे तिन्ही प्रेवशद्वार बंद ठेवले होते. एका गेटमधून प्रत्येकाची खातरजमा करुनच प्रवेश दिला जात होता. या शिवाय साध्या वेशातील पोलिसही जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात तैनात होते.  सुरेश पाटील, राजेंद्र गपाट, शब्बीर शेख, किशोर मारकड, विकास मारकड आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Tags : MNS, Female Osmanabad, President Attempts, Suicide,