Mon, Sep 23, 2019 04:06



होमपेज › Marathwada › हेडफोन घालून चालत गेला अन् थेट गच्चीवरून खाली कोसळला

हेडफोन घालून चालत गेला अन् थेट गच्चीवरून खाली कोसळला

Published On: Sep 12 2019 3:20PM | Last Updated: Sep 12 2019 3:20PM




अंबाजोगाई (बीड) : प्रतिनिधी 

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंदतीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्याच्या गच्चीवरून तोल जाऊन पडल्याची घटना बुधवारी रात्री  घडली. तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

गगन सुरजभान सिंगला (वय २१, रा. पंजाब) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. गगन सध्या एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिकत असून तो स्वराती वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील कोंढाणा नावाच्या वसतिगृहात राहतो. बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास तो वसतिगृहाच्या गच्चीवर कानात हेडफोन लावून गाणे ऐकत शतपावली करत होता. 

यावेळी अंधाऱ्या भागात तो कठड्याजवळ आला असता अचानक तोल गेल्याने तो खाली पडला आणि जबर जखमी झाला. इतर विद्यार्थ्यांनी त्याला तातडीने स्वाराती रूग्णालयात दाखल केले. गगनची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती गगनच्या पालकांना देण्यात आली असल्याचे संबंधितांनी सांगितले.